Narayan Rane Court Setback: नारायण राणेंना मोठा झटका, संजय राऊतांवरील त्या' वक्तव्याची कोर्टाकडून दखल!

Sanjay Raut Vs Narayan Rane Court Case: मुंबईतील भांडूपमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना त्यांनी मीच खासदार केल्याचे वक्तव्य केले होते. त्याविरोधात राऊतांनी मानहानीचा खटला दाखल केला होता.
Sanjay Raut Vs Narayan Rane
Sanjay Raut Vs Narayan RaneSarkarnama
Published on
Updated on

Sanjay Raut Defamation Case: माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात केलेले वक्तव्य त्यांना भोवण्याची शक्यता आहे. त्यांच्या वक्तव्याविरोधात राऊत यांनी मानहानीचा खटला दाखल केला होता. त्या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने नारायण राणेंना मोठा झटका दिला आहे.

नारायण राणे यांना कोर्टाने समन्स बजावले होते. मात्र, या समन्सला आव्हान देणारा अर्ज त्यांनी न्यायलायत केला होता. न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे राणेंना आता कोर्टात हजर राहावे लागणार आहे.

मुंबईतील भांडूपमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना त्यांनी मीच खासदार केल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात राऊत यांनी मानहानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणात नारायण राणेंना कोर्टाने झटका दिल्याने पुढील समन्सला कोर्टात हजर राहावे लागणार आहे.

Sanjay Raut Vs Narayan Rane
Pravin Gaikwad : "पोलीस संरक्षण घेणार नाही"; शाई फेक हल्ल्यानंतर प्रविण गायकवाडांनी घेतली शरद पवारांची भेट

राणेंनी समन्स रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र, अतिरिक्त न्यायाधीश एस आर नावंदर यांनी ही मागणी फेटाळली. राऊत यांच्या बदनामीचा उद्देश ठेऊन राणे यांनी वक्तव्य केल्याचे राऊतांच्या वकिलाचा युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला.

राणे विरुद्ध राऊत वाद आणखी पेटणार

नारायण राणे यांच्यासह मंत्री नितेश राणे यांच्या विरोधात संजय राऊत यांनी आधीच मानहानीचा दावा दाखल केला होता. त्या दाव्यात देखील नितेश राणे यांना न्यायालयाने दिलास न देता कोर्टात हजर राहण्यास सांगितले होते. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राणे विरुद्ध राऊत हा वाद आणखीच वाढत जाण्याची शक्यता आहे.

Sanjay Raut Vs Narayan Rane
Gopichand Padalkar Insults Jitendra Awhad : 'तुझ्या गां*** किती दम, कुत्री घेऊन फिरत नाही', गोपीचंद पडळकर- जितेंद्र आव्हाड भिडले, जोरदार राडा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com