Maratha Reservation : संजय राऊत म्हणतात ''कॅबिनेटमध्ये गँगवॉर''; तर शंभूराज देसाईंनीही केला पलटवार, म्हणाले...

Sanjay Raut Vs Shambhuraj Desai : जाणून घ्या, राऊतांच्या टीकेवर मंत्री शंभूराज देसाईंनी नेमकं काय प्रत्युत्तर दिलं आहे.
Raut adn Desai
Raut adn DesaiSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. कॅबिनेटमध्ये गँगवॉरसारखी परिस्थिती असल्याचे ते म्हणाले आहेत, तर त्यांच्या टीकेला मंत्री शंभूराज देसाईंनीही प्रत्युत्तर दिले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Raut adn Desai
Thackeray vs Shinde : मी आवाज उठवल्याने १००० कोटी वाचले; आदित्य ठाकरेंचे CM शिंदेंवर घोटाळ्याचे आरोप

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, ''कॅबिनेटमध्ये गँगवॉरसारखी परिस्थिती आहे. या विषयावर कॅबिनेटमध्ये टोळी युद्ध आहे. एखाद्या मंत्र्यांच्या अंगावर दुसरा मंत्री धावून जाण्यापर्यंत परिस्थिती निर्माण झाली आहे. या राज्यात असं चित्र कधीच नव्हतं. मुख्यमंत्री जर आपल्या मंत्र्यांवर नियंत्रण ठेवू शकत नसतील, तर मंत्रिमंडळात त्यांना प्रमुख म्हणून बसण्याचा अधिकार नाही.''

याशिवाय, ''छगन भुजबळ एक बोलताहेत, शंभूराज देसाई दुसऱ्या टोकाला बोलताय, तर इतर मंत्र्यांचं तिसरंच टोक आहे आणि मुख्यमंत्री या विषयावर मौन बाळगून आहेत,'' असंही संजय राऊत यांनी बोलून दाखवलं.

Raut adn Desai
Good News : मुख्यमंत्र्यांनी केली आशा कर्मचाऱ्यांना सात हजारांची घसघशीत पगारवाढ!

राऊतांच्या या टीकेवर प्रत्युत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, ''मंत्रिमंडळात गँगवॉर हा हास्यास्पद शब्द संजय राऊतांसारखा चार टर्म खासदार असणारा व्यक्ती बोलतो, याचं आम्हाला आश्चर्य वाटतं. मंत्रिमंडळातील सर्व मंत्री महोदय हे जबाबदार आहेत. निश्चितच अशा पद्धतीचं किंचतही काही घडलं नाही.''

Raut adn Desai
Pankaja Munde News : ''जाळपोळीमुळे इतर समाजाच्या मनात सुप्त ज्वालामुखी...''; पंकजांचं सूचक विधान

याचबरोबर ''उलट आमचे सहकारी हसन मुश्रीफ यांनी सकाळीच सांगितलं आहे, की असं काही जर राऊत सिद्ध करू शकले, त्यांनी जर त्याचा काही पुरावा दाखवला तर आम्ही राजीनामा देऊ. त्यामुळे मुश्रीफांच्या भूमिकेशी मी पूर्णपणे सहमत आहे. असं बिल्कुल काही नाही. संजय राऊतांना सवय आहे, उचलली जीभ लावली टाळ्याला. त्यामुळे त्यांना मनाला वाटेल तसं ते बोलतात,'' अशा शब्दांमध्ये शंभूराज देसाईंनी संजय राऊतांच्या टीकेवर पलटवार केला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com