

Kailas Patil News : चार वर्षांपूर्वी शिवसेनेत झालेल्या बंडादरम्यान सुरतला जाताना माघारी फिरणाऱ्या आमदाराचं 'राम नाम सत्य' झालं असतं, असं खळबळजनक वक्तव्य मंत्री संजय शिरसाट यांनी केलं आहे. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचेधाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी पलटवार करत सुरत बॉर्डरवरून माघारी परतणारा तो आमदार आपणच असल्याचा सांगत परत येताना समोरचे लोक कोणत्याही स्तराला जाऊ शकतात, याची जाणीव आपल्याला होती, असे म्हटले आहे.
कैलास पाटील म्हणाले, 'राज्याचे जबाबदार मंत्रीच जर अशा प्रकारे उघडपणे वक्तव्य करत असतील, तर त्यांना ही हिंमत सत्तेच्या जोरावर मिळते का? या संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशी करावी आणि त्यावेळी नेमकं काय घडलं होतं, याचं सत्य जनतेसमोर आणावं.'
मंत्री शिरसाट नेमकं काय म्हणाले?
संजय शिरसाट यांनी म्हटलं होतं की, "गेल्या उठावादरम्यान सुरतला जात असताना एक आमदार आमच्या गटातून निसटून दुसऱ्या ट्रॅकवर म्हणजेच वेगळ्या दिशेने गेला होता. त्यावेळी आम्ही आमच्या लोकांना थांबवलं, अन्यथा परत जाणाऱ्या त्या आमदाराचं 'राम नाम सत्य' झालं असतं."
दरम्यान, आपल्या या विधानावर स्पष्टीकरण देताना शिरसाट यांनी पुढे नमूद केलं की, "हा गेल्या उठावादरम्यानचा प्रसंग असून त्यावर आता बोलणे योग्य नाही. त्यावेळी आमच्या डोक्यात तशी कोणतीही कल्पना नव्हती. मात्र, एक आमदार एकटाच माघारी जाणार होता आणि आमच्यावर जबरदस्ती केली असती तर काहीही घडू शकले असते, या संदर्भाने मी 'राम नाम सत्य' असं म्हटलं होतं. आम्ही त्याला जाऊ दिले." यासोबतच, एकनाथ शिंदे यांनी एका आमदाराच्या कौटुंबिक अडचणीच्या वेळी स्वतः विमानाची व्यवस्था करून दिली होती, असा दावाही शिरसाट यांनी यावेळी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.