Sanjay Verma : पोलिस महासंचालकपदी संजय वर्मा यांची नियुक्ती; निवडणूक आयोगाकडून शिक्कामोर्तब

Sanjay Verma Appointed as Maharashtra DGP: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने दोन दिवसांपूर्वीच रश्मी शुक्ला यांना या पदावरून हटवले होते.
Election Commission
Election CommissionSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना पोलिस महासंचालक पदावरून हटवले होते. त्यानंतर या पदावर कुणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता होती. अखेर आयोगाने संजय कुमार वर्मा यांची महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

महाविकास आघाडीने रश्मी शुक्ला यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्यांना पदावरून हटवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर आयोगाने दोन दिवसांपूर्वी शुक्ला यांना पदावरून हटवले. तसेच राज्य सरकारला तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे पाठवण्यास सांगितले होते.

Election Commission
Ahilyanagar Election: काय व्हायचं ते होऊ देत! पाच माजी आमदारांनी पक्षादेश झुगारला

आयोगाने मंगळवारी संजय कुमार वर्मा यांची पोलिस महासंचालक पदावरून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्राला नवे पोलिस महासंचालक मिळाले आहेत. रश्मी शुक्ला यांची मुदत संपल्यानंतर त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती.

Election Commission
Kolhapur Assembly Election : कोल्हापूर उत्तरेत राजकीय भूकंप; राधानगरी, चंदगड अन् इचलकरंजीत बंडखोरी कायम!

रश्मी शुक्ला यांनी आपले फोन टॅप केल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले होते. त्यामुळे त्यांच्या नियंत्रणाखाली निवडणूक घेऊ नये, त्यामुळे त्यांना पदावरून हटवावे, अशी मागणी आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती.

दरम्यान, संजय वर्मा हे 1990 च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी आहेत. सध्या ते गृह खात्याच्या कायदेशीर आणि तांत्रिक विभागाचे महासंचालक आहेत. डीजीपी पदासाठी वर्मा यांचे नाव आघाडीवर होते. ते एप्रिल 2028 मध्ये निवृत्त होणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com