Santosh Deshmukh News : संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. डिसेंबर महिन्यात संतोष देशमुख यांची हत्या झाली. या प्रकरणात तब्बल नऊ जणांना अटक केली असून मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना या प्रकरणात मुख्य आरोपी करण्यात आले आहे. या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू असून सीआयडीने तब्बल दीड हजार पानांचे दोषारोपत्र दाखल केले आहे.
संतोष देशमुखांच्या हत्येची सुनावणी सुरू असताना त्यांचे शेवटचे भाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. निवडणुकीत प्रचार करत असतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला असून ते त्यांनी केलेल्या कामासंदर्भात सांगत आहेत.
संतोष देशमुख शेवटच्या भाषणात म्हणतात की, 'मला गरिबांसाठी काम करायचे आहे. मला राजकारण कमी आणि समाजकारण जास्त करायचे आहे. समाजकारणाची मला पहिल्यापासून आवड आहे. 10 वर्षांपासून माणसांची दारू सोडवण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. मी व्यसनमुक्तीसाठी फार झटलो आहे. मी कधी पैशांच्या मागे गेलो नाही. दुष्काळात स्वखर्चाने गावाला मदत केली आहे.'
संतोष देशमुख हे मस्साजोग गावचे 10 वर्ष सरपंच होते. गावामध्ये त्यांनी दारुबंदी राबवण्यासाठी प्रयत्न केले होते. ते शांत स्वभावाचे होते. कामावर त्यांचा विश्वास होता. कामातूनच त्यांना प्रसिद्धी मिळाली होती. गावातील कंपनीमधून वाल्मिक कराड यांचे लोक खंडणी गोळा करत असल्याने त्यांना त्याला विरोध केला होता. कंपनीत काम करणाऱ्या गावातील तरुणाला मारहाण करणाऱ्या वाल्मिक कराडच्या माणसांना त्यांनी चोप दिला होता. त्यानंतर त्यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती.
संतोष देशमुख यांची निर्घूण हत्या करण्यात आली. सीआयडीने न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आलेले फोटो दिले होते. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अतिशय निर्दयीपणे आरोपी हे संतोष देशमुखांना मारहाण करत असल्याचे या फोटोमधून दिसत होते.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.