Sharad Pawar Party leader allegations : बीडमधील गुन्हेगारीचा पॅटर्न तीन स्तंभांवर आधारलेला; शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्याचे गंभीर आरोप

Crime pattern in Beed News : बीडचा गुन्हेगारीशी संबंध जोडला जात असल्याने बीडमधील नागरिकांकडून सातत्याने याबाबत रोष व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी बीडच्या गुन्हेगारीबाबत वक्तव्य केले आहे.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : मस्साजोगचे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीडमधील गुन्हेगारी बाबतच्या चर्चा सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहेत. बीडचा गुन्हेगारीशी संबंध जोडला जात असल्याने बीडमधील नागरिकांकडून सातत्याने याबाबत रोष व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी बीडच्या गुन्हेगारीबाबत वक्तव्य केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून बीडमधील वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. बीड जिल्ह्यातच अधिकृत शस्त्र प्रमाणे मोठ्या प्रमाणात देण्यात आल्याचा देखील याच दरम्यान प्रकाश झोतात आले आहे. यानंतर पोलीस प्रशासनाने जागे होत ज्यांच्या वर गंभीर गुन्हे आहेत, अशा अनेक मंडळींचे शस्त्र परवाने रद्द करण्यास सुरुवात केली आहे. तसेच गुन्हेगारीची पाळेमुळे खोदण्यासही पोलीस सरसावले आहेत.

Sharad Pawar
Saif Ali Khan Attack : सैफवर जीवघेणा हल्ला; राऊतांचा PM मोदींसह फडणवीसांवर निशाणा, म्हणाले, "त्यामुळेच बीड ते मुंबईपर्यंत..."

एकीकडे प्रशासन गुन्हेगारीवरती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे मात्र बीडच्या गुन्हेगारींवरून सातत्याने राजकीय टीकाटिपणी होताना पाहायला मिळत आहे. अशातच शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी बीडच्या गुन्हेगारीबाबत एक सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

Sharad Pawar
Saif Ali Khan Attacked : "हे सारं वांद्रा येथे घडलंय, सर्वाधिक सेलिब्रिटी तिथं राहतात...मग कोण सुरक्षित?" ठाकरेसेना आक्रमक

रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, 'बीड प्रकरणात उशिरा का होईना सरकारने अखेर न्यायालयीन समिती नेमली व समितीत चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या माजी न्यायमूर्ती एम. एल. तहलियानी यांची नेमणुक केल्याबद्दल सरकारचे आभार. बीडमधील गुन्हेगारीचा पॅटर्न हा राजकीय आश्रय, मर्जीतले प्रशासन आणि गुंड अशा तीन स्तंभांवर आधारलेला असून अत्यंत घातक आहे, या पॅटर्नमध्ये लोकांना धमकावून किंवा प्रशासनाला हाताशी धरून खोटे गुन्हे दाखल करून कराडची टोळी हवे ते मग ते काहीही असो, असे सर्व प्राप्त करून घेते. सहा सात महिन्यांपूर्वी याच पद्धतीने कराड टोळीने बबन गीतेंना सुद्धा अडकवले होते. तपास केला तर अशा असंख्य घटना समोर येतील.

Sharad Pawar
Saif Ali Khan Attacked : सैफ अली खानवर चाकू हल्ला; काँग्रेस खासदार पोलिसांसह सरकावर भडकल्या, "कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे..."

न्यायालयीन समिती खोलात जाऊन पारदर्शक तपास करून गुंडगिरीचा हा पॅटर्न मोडून काढेल, ही अपेक्षा आणि संघर्षाची कष्टकऱ्यांची भूमी असलेला तसेच मोठा वैचारिक वारसा लाभलेला बीड जिल्हा गुंडगिरीच्या ग्रहणातून मुक्त होईल, हा विश्वास आहे, असे रोहित पवार म्हणाले.

Sharad Pawar
Kolhapur Politics : पुन्हा जुळली राजकीय सोयरीक; पराभूत उमेदवाराने मंत्रिपद मिळालेल्या आमदाराचे लावले बॅनर!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com