Sarkarnama Podcast : जेव्हा छगन भुजबळ इक्बाल शेख झाले तेव्हा!

Sanyukta Maharashtra Movement | छगन भुजबळ…. आधी शिवसेना, मग काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस. याच हटके स्टाईलमध्ये भुजबळांनी एक आंदोलन केलं ज्याची आठवण आजही काढली जाते.
Chhagan Bhujbal | Sarkarnama Podcast :
Chhagan Bhujbal | Sarkarnama Podcast : Facebook @ChhaganBhujbal
Published on
Updated on

Chaggan Bhujbal and Sanyukta Maharashtra movement | मुंबईचे नगरसेवक, मुंबईचे महापौर, शिवसेनेचे आमदार, नंतर राज्यात मंत्री, दोन वेळा उपमुख्यमंत्री, अशी विविध पदं भूषविणारे भुजबळ हे आक्रमक नेते म्हणजे छगन भुजबळ. छगन भुजबळ हे राजकारणातलं एक वेगळंच रसायन आहे. १९९१ मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर मतभेद झाल्यानंतर शिवसेना सोडून नंतर काँग्रेस आणि पुढं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या भुजबळांनी खूप चढउतार पाहिले. याच छगन भुजबळांबद्द्ल आज आपण जाणून घेणार आहोत.

मुंबईच्या भायखळा मार्केटमध्ये भाजी विकणारे भुजबळांनी राजकारणात यशाची शिखरे पादाक्रांत केली. सुरुवातीला शिवसेनेत असताना भुजबळ खूपच आक्रमक होते.पुढेही भुजबळांच्या आयुष्यात खूप चढ-उतार आले. दरवेळी वादाच्या प्रसंगी भुजबळ यांची राजकीय कारकिर्द संपुष्टात आल्याची चर्चा झाली. पण प्रत्येक वेळी त्यांनी तितक्याच वेगानं मुसंडी मारत पुन्हा राजकीय मैदान गाजवलं. राजकारणात मुरलेला हा माणूस कलाप्रेमीही आहे. त्याचबरोबर गेल्या काही वर्षांपासून राजकारणातील ते स्टाइल आयकॉनही ठरलेत.राजकारणात मफलरचा शिताफीने वापर करत त्यानी आपली वेगळी ओळखच निर्माण केलीये.हा मफलर त्यांच्या जणू ट्रेडमार्कच बनलाय.

पण ही झाली पुढची चर्चा.भुजबळ म्हटलं की आठवतं ते संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन.शिवसेनेत आक्रमक असलेल्या भुजबळांची या आंदोलनाची एक वेगळीच आठवण आहे...आजही संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा विषय निघाला की चर्चा होते भुजबळांच्या वेषांतराची.काय घडलं होतं त्यावेळी?

त्याचं झालं असं की, `मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी` हे शिवसेनेचे ब्रीद. (त्यासाठी बरोब्बर पस्तीस वर्षांपूर्वी शिवसेना नेते छगन भुजबळ यांनी कन्नड भाषेच्या सक्तीविरोधात बेळगावात वेषांतर करून प्रकट होत आंदोलन केले होते. त्यासाठी त्यांनी दुबईचा व्यापारी इक्बाल शेख असल्याचं भासवून गोव्याच्या मार्गानं बेळगावात प्रवेश करून कानडी पोलिसांना आश्चर्याचा धक्का दिला होता.

Chhagan Bhujbal | Sarkarnama Podcast :
SARKARNAMA PODCAST : नादानपणा बिलावल भुट्टोंचा...

बेळगाव, कारवार भागात कर्नाटक सरकारने १९८६ मध्ये कन्नड भाषेची सक्ती केली. त्यात मराठी भाषकांचा आवाज दडपून टाकण्याचे त्यांचे धोरण होते. त्याविरोधात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत मराठी भाषकांची बाजू घेतली. कर्नाटक सीमेवरून महाराष्ट्रातील कोणालाही बेळगावला येऊ दिले जात नव्हते. याविरोधात शिवसेना आंदोलनावर ठाम होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तशी घोषणाच केली होती. शिवसेनेचे आक्रमक नेते असलेल्या छगन भुजबळ यांनी धाडस व कल्पकतेचा मिलाफ घडवत शिवसेनाप्रमुखांचा तो आदेश प्रत्यक्षात आणला. तो दिवस होता ४ जून. अर्थात बरोबर छत्तीस वर्षांपूर्वीचा.

तेव्हा महाराष्ट्रातून कर्नाटकात येण्याचे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. सीमेवरील हे सर्व मार्ग बंद करण्यात आल्यानं भुजबळांनी गोवा मार्गे बेळगावला जाण्याचं निश्चित केलं. त्यासाठी त्यांनी अगदी चित्रपटातील एखादा प्रसंग वाटावा असे नाट्य घडविलं. त्यांनी दुबईचे व्यापारी इक्बाल शेख यांची वेशभूषा केली. मुंबईहून एक अॅम्बासेडर कार घेऊन ते गोव्याहून बेळगावात दाखल झाले. मध्यरात्रीच्या सुमारास ते बेळगावात दाखल झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी कर्नाटक सरकारच्या कन्नड सक्तीच्या विरोधात गनिमी काव्याने शिवसेनेचे आंदोलन केलं.

Chhagan Bhujbal | Sarkarnama Podcast :
Sarkarnama Podcast : अनाथ आदिवासी मुलीच्या अत्याचाराची करूण कथा, ज्यामुळे बलात्कार कायद्यात झाले बदल!

या आंदोलनानंतर कर्नाटक पोलिसही ही मंडळी बेळगावात कशी दाखल झाली?, या प्रश्नाने आश्चर्यचकीत झाली. त्यांनी भुजबळ व त्यांच्या सहकाऱ्यांना अटक केली. अटक केल्यावर त्यांची रवानगी धारवाड कारागृहात करण्यात आली. दोन महिने त्यांना कारागृहात काढावे लागले. दोन महिन्यांनी सुटका झाल्यावर ते मुंबईत परतले. तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी त्यांच्या पाठीवर थाप देत कौतुक केले. मराठी भाषिकांसाठी झालेल्या त्या आंदोलनाची आठवण आजही काढली जाते. शिवसेनेचे ब्रीद होते, `मराठी माणसाच्या न्याय, हक्कासाठी` या आंदोलनाने ते प्रत्यक्षात आल्याचा विश्वास बेळगावच्या मराठी माणसांना मिळाला.

या आंदोलनात भुजबळ यांच्या समवेत दगडू सपकाळ, बाबा पिंगळे, अरविंद तायडे, हेमंत मंडलिक असे विविध शिवसेना कार्यकर्ते होते. त्यांना वेशभूषा करण्यासाठी शिवसेना नेते प्रमोद नलावडे यांनी देखील मदत केली होती.आजही महाराष्ट्र कर्नाटकचा सीमा प्रश्न सुटलेला नाही. पण या सीमाप्रश्नासाठी झालेल्या आंदोलनांच्या आठवणीही मराठी माणसाच्या मनातून पुसल्या गेलेल्या नाहीत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com