
Sambhaji Bhide On Dhananjay Munde resignation : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh) सीआयडीकडून दोषारोप पत्र दाखल करण्यात आलं आहे. या दोषारोप पत्रातील देशमुख यांच्या हत्येचे संतापजनक फोटो समोर आले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे.
ठिकठिकाणी संतप्त नागरिकांनी या हत्येचा निषेध करण्यासाठी आंदोलन केल्याचंही पाहायला मिळत आहे. विरोधकांनी देखील आक्रमक पवित्रा घेत या हत्या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार असलेल्या वाल्मिक कराडशी जवळीक असलेले मंत्री धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) राजीनाम्याची मागणी लावून धरली होती.
त्यानंतर अखेर मंगळवारी (ता.04) धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यावर राज्यभरातून विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील नेते प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी त्यांनी राजीनामा द्यायला खूप उशीर केल्याचा आरोपही केला आहे.
तर त्यांना मंत्रिपद द्यायलाच नको होतं, असं वक्तव्य बहीण पंकजा मुंडे केलं आहे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर राज्यभरातून राजकीय प्रतिक्रिया येत असतानाच आता श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी (Sambhaji Bhide) यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली.
पत्रकार परिषदेत त्यांना धनंजय मुंडेंबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी तो राजकीय विषय आहे असं म्हणाले. मात्र, पुढे बोलताना ते म्हणाले, दुर्दैव असं की धनंजय मुंडे असो वा इतर राज्यकर्ते जे काही वागत आहेत. ते बरोबर नाही.
सर्वच राजकारण्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवनचरित्र आणि मराठ्यांचा इतिहास बारकाईने वाचला पाहिजे, असा सल्ला त्यांनी यावेळी राज्यकर्त्यांना दिला. तसंच या देशाला राष्ट्र म्हणून टिकवायचे असेल तर मराठ्यांचा इतिहास देशभरात दहावीपर्यंत सक्तीचा केला पाहिजे, असंही ते यावेळी म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.