Schools in Maharashtra : आता शाळाही अदानींकडे; केसरकर म्हणतात, त्यात चुकीचे काय?

Chandrapur News Ambadas Danve Deepak kesarkar : महाराष्ट्र सरकारच्या शाळा दत्तक योजनेअंतर्गत सरकारी शाळा चालवण्यास दिल्या जातात.
Adani Group in Maharashtra
Adani Group in MaharashtraSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : राज्य सरकारने अदानी उद्योगसमुहाला आता एक शाळा दत्तक दिली आहे. त्यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी त्यात चुकीचे काय असे म्हणत या निर्णयाचे समर्थन केले आहे.

शालेय शिक्षण विभागाकडून चंद्रपूरमधील माऊंट कार्मेल कॉन्हेंट ही उच्च माध्यमिक शाळा अदानी समूहाला हस्तांतरित करण्यात आली आहे. पुढील 15 दिवसांत शाळेच व्यवस्थापन बदलण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच प्रसिध्द करण्यात आला आहे.

Adani Group in Maharashtra
PCMC News : एका दिवसात 'PCMC'च्या 8 कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला, कारण...

अदानी फाऊंडेशनकडून या शाळेचे व्यवस्थापन केले जाणार आहे. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टीका केली आहे. त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले आहे की, देशाला शिक्षणाचा मार्ग देणाऱ्या महाराष्ट्रावर आज अदानी समुहाच्या हातून बाराखडी लिहिण्याची वेळ आली आहे.

जमीन, उद्योग कमी होते ते आता शाळा देखील हे सरकार अदानीच्या ताब्यात देत आहे. आता थेट चंद्रपूरच्या माउंट कार्मेल शाळेचा कारभार या सरकारने अदानी समूहाकडे दिला आहे. महाराष्ट्र विक्रीला काढल्याचे हे उत्तम उदाहरण सरकारने दिले आहे, असा हल्लाबोल दानवेंनी केला आहे.

Adani Group in Maharashtra
Devendra fadnavis Politics: शिंदे, फडणवीसांनी नाशिकमध्ये फुंकला महायुतीच्या प्रचाराचा बिगुल!

शिक्षण विभागाच्या या निर्णयावर बोलताना केसरकर यांनी यात काही चुकीचे नसल्याचे म्हटले आहे. मीडियाशी बोलताना ते म्हणाले, अनेक उद्योगसमुहांनी शाळांना मदत करावी, अशी अपेक्षा आहे. आमच्या शाळा दत्तक योजनेत आपण व्यवस्थापन हस्तांतरित करत नाही. फक्त त्यात सुधारणा करतो. कुठल्याही संस्थेने शाळा मागितल्या तर त्यांना देतो.

एखादा उद्योग असेल तर त्यांच्या सीएसआरखाली चांगल्या शाळा देण्याची आवश्यकता आहे. त्यात चुकीचे काहीच नाही. मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठीचा खर्च जर एखादा उद्योग करत असेल तर त्यात चुकीचे काही वाटत नाही. शाळांचा अभ्यासक्रम शिक्षण विभाग ठरवतो. पण मुलांना अधिकच्या सुविधा द्यावा लागतात, त्यासाठी जर कुणी खर्च करायला पुढे येणार असेल तर त्याचे स्वागतच करायला हवे, असेही केसरकर यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com