SET Exam Date 2026 : सेट परीक्षेची तारीख अखेर जाहीर! 'या' दिवशी होणार परीक्षा, जाणून घ्या सविस्तर...

State Eligibility Test exam schedule 2026: SET परीक्षा 2026 ची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे. परीक्षेचे वेळापत्रक, महत्त्वाच्या तारखा, प्रवेशपत्र आणि इतर सविस्तर माहिती जाणून घ्या.
SET Exam 2026 date announced
SET Exam 2026 date announcedSarkarnama
Published on
Updated on

SET exam detailed schedule 2026: राज्यासह गोव्यातील सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आवश्यक आणि बहुप्रतिक्षेत असणाऱ्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षेच्या (सेट) तारखा जाहीर झाल्या आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांसाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) २६ जुलै रोजी होणार आहे. विद्यापीठाच्या सेट परीक्षा विभागातर्फे ४१ वी सेट परीक्षा आयोजित केली असून या परीक्षेसाठी नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची प्रक्रिया येत्या मंगळवारपासून (ता. २) सुरू होत आहे.

ही परीक्षा मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, परभणी, नंदुरबार आणि पणजी (गोवा) या शहरातील केंद्रांवर घेण्यात येईल. विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीने विद्यापीठाच्या ‘https://setexam.unipune.ac.in’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह परीक्षा अर्ज दोन जून सकाळी ११ वाजल्यापासून ते १६ जूनपर्यंत सायंकाळी सहा वाजेपर्यंत करता येणार आहे. तर विलंब शुल्कासह विद्यार्थ्यांना १७ ते १९ जून पर्यंत अर्ज भरता येणार आहे.

SET Exam 2026 date announced
Congress Leader on Petrol price hike : सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार! पेट्रोल 150 अन् डिझेल थेट 170 रुपये लिटर पार..? काँग्रेस नेत्याच्या दाव्यानं खळबळ!

विद्यार्थ्यांनी दिलेल्या नमुन्यातील संपूर्ण अर्ज संगणकावर ऑनलाइन पद्धतीने अचूक भरावेत. अर्जाची छापील प्रत स्वत:कडे जतन करून ठेवावी. ही प्रत कोणत्याही परीक्षा केंद्रावर अथवा सेट विभागात पाठवू नये, अशा स्पष्ट सूचना विद्यापीठाने दिल्या आहेत.

सेट परीक्षेचे शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांची यादी विद्यापीठाच्या ‘https://setexam.unipune.ac.in’ या संकेतस्थळावर साधारणत: जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात प्रसिद्ध करण्यात येईल.

SET Exam 2026 date announced
Amit Shah Onion Procurement: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कांदा खरेदीबाबत अमित शाह मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत दिले संकेत...

परीक्षा शुल्क भरून सुद्धा ज्या विद्यार्थ्यांचे नाव यादीत समाविष्ट नसेल, अशा विद्यार्थ्यांनी शुल्क भरल्याचा पुरावा ‘set-support@pun.unipune.ac.in’ या ईमेल आयडीवर पाठवावा. सेट परीक्षेचे माहितीपत्रक आणि अभ्यासक्रम विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

विद्यार्थी एखाद्या विषयात आधीच सेट परीक्षा उत्तीर्ण झाला असेल, तर त्याला परत त्याच विषयात सेट परीक्षा देता येणार नाही, असे विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव आणि ‘सेट’चे सदस्य सचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी स्पष्ट केले आहे.

सेट परीक्षेसाठी अर्ज भरण्याचा तपशील :

- नियमित शुल्कासह : २ ते १६ जून

- विलंब शुल्कासह : १७ ते १९ जून

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com