Shaktipeeth Videos Scam : 10 व्हिडिओसाठी तब्बल 2.93 कोटींचा कंत्राट! 'या' मंत्रालयाचा 'कारभार' चव्हाट्यावर! घोटाळ्याचा आरोप!

Shaktipeeth Highway : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या साडेतीन शक्तिपीठांची माहिती देणारे अवघे १० व्हिडिओ बनवून ते सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्याचे नियोजन पर्यटन विभागाने केले होते. मात्र, या घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
shaktipeeth mahamarg
shaktipeeth mahamarg Sarkarnama
Published on
Updated on

Shaktipeeth Highway Videos : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांच्या प्रचार आणि प्रसारासाठी व्हिडिओ बनवण्याच्या ठेक्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने कोणत्याही प्रकारचे टेंडर न काढता आपल्या मर्जीतील कंपनीला तब्बल २ कोटी ९३ लाख रुपयांचे कंत्राट बहाल केल्याचा खळबळजनक आरोप कल्पतरू फाऊंडेशनचे संजय तांबे यांनी केला आहे. या संबंधित वृत्त 'साम टिव्ही'ने दिले आहे.

बाजारभावानुसार अत्यंत कमी खर्चात होणाऱ्या या कामासाठी तिप्पट दर आकारून सुमारे दोन कोटी रुपयांचा अपहार करण्याचा हा डाव असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या साडेतीन शक्तिपीठांची माहिती देणारे अवघे १० व्हिडिओ बनवून ते सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्याचे नियोजन पर्यटन विभागाने केले होते. यासाठी 'एस के युनिटी इंडिया मल्टी सर्विसेस एलएलपी'या कंपनीची विनानिविदा 'प्रायोजकत्व' स्वरूपात थेट निवड करण्यात आली आणि त्यांना २ कोटी ९३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला, असे तांबे यांनी सांगितले.

तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, हे व्हिडिओ साध्या एचडी कॅमेऱ्याद्वारे चित्रित केले जाणार आहेत. व्यावसायिक बाजारपेठेचा विचार केल्यास, असे व्हिडिओ बनवण्याचे काम साधारण ७० ते ८० लाख रुपये किंवा जास्तीत जास्त १ कोटी रुपयांपर्यंत सहज होऊ शकले असते. मात्र, पर्यटन विभागाने सर्व नियम धाब्यावर बसवून मर्जीतील कंपनीला तिप्पट दराने म्हणजेच जवळपास ३ कोटींना हे काम दिले. यामुळे शासकीय तिजोरीचे थेट २ कोटी रुपयांचे नुकसान झाले असून हा सरळ सरळ गैरव्यवहार आहे.

shaktipeeth mahamarg
Bribery Case Jalgaon : लाचखोर जिल्हाधिकाऱ्याच्या सीलबंद घरातून पुरावे चोरण्याचा प्रयत्न, दोघांना रंगेहात अटक

उच्च न्यायालयात जाणार

या संदर्भात संबंधित प्रशासनाकडे रीतसर तक्रार दाखल करण्यात आली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. जर पर्यटन विभागाने किंवा शासनाने या तक्रारीची दखल घेऊन कारवाई केली नाही, तर या घोटाळ्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये जनहित याचिका दाखल करून दाद मागणार असल्याचा इशारा तांबे यांनी दिला आहे.

shaktipeeth mahamarg
Bribery Case : सहाय्यक आयुक्ताच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश: अनधिकृत बांधकाम प्रकरणात एसीबीची कारवाई, अडीच लाख स्वीकारताना ठोकल्या बेड्या

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com