Shalarth e-KYC: शिक्षण संचालनालयाचा मोठा निर्णय; 'या' शिक्षकांचे वेतन रोखणार? तुम्ही 'ही' प्रक्रिया पूर्ण केलीय का?

E-KYC mandatory for teachers and non-teaching staff: शालार्थ प्रणालीतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. ई-केवायसी पूर्ण न केल्यास ऑगस्ट व सप्टेंबर २०२६ चे वेतन मिळणार नाही.
E-KYC mandatory for teachers and non-teaching staff
E-KYC mandatory for teachers and non-teaching staffSarkarnama
Published on
Updated on

Pune News: महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालयाने (प्राथमिक तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक) शालार्थ प्रणालीतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेबाबत महत्त्वाचे परिपत्रक काढले आहे. या आदेशानुसार,अनुदानित, खासगी अनुदानित आणि जिल्हा परिषदांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शालार्थ प्रणालीतून वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ई-केवायसी तातडीने पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

ऑगस्ट २०२६ आणि सप्टेंबर २०२६ चे वेतन अदा करण्यापूर्वी ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ई-केवायसी पूर्ण न करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन वितरित केले जाणार नसल्याचा इशाराही शिक्षण संचालनालयाने दिला आहे.

परिपत्रकातील महत्त्वाचे मुद्दे

शिक्षण संचालनालयाने काढलेल्या आदेशानुसार वित्त विभागाच्या यापूर्वीच्या शासन परिपत्रकांचा तसेच प्रधान सचिव, वित्त विभाग यांनी २८ जुलै २०२६ रोजी झालेल्या आढावा बैठकीत दिलेल्या सूचनांना संदर्भ देण्यात आला आहे.

याआधीही ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, अद्याप अनेक कर्मचाऱ्यांची प्रक्रिया अपूर्ण असल्याने आता कठोर भूमिका घेण्यात आली आहे.

कोणासाठी लागू?

हा आदेश खालील सर्व संस्थांतील शालार्थ प्रणालीतून वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना लागू राहणार आहे.

  • अनुदानित शाळा

  • खासगी अनुदानित शाळा

  • जिल्हा परिषद प्राथमिक शाळा

  • जिल्हा परिषद माध्यमिक शाळा

  • शालार्थ प्रणालीतून वेतन घेणारे सर्व शिक्षक

  • सर्व शिक्षकेतर कर्मचारी

  • ई-केवायसी न केल्यास काय होणार?

परिपत्रकानुसार,

ऑगस्ट २०२६ आणि सप्टेंबर २०२६ चे वेतन आहरित (Draw) केले जाणार नाही.

ई-केवायसी पूर्ण न केलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार नाही.

याबाबत कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

अधिकाऱ्यांना सूचना

शिक्षण संचालनालयाने विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक तसेच वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाच्या अधिकाऱ्यांना संबंधित सर्व शाळांना तात्काळ सूचना देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच प्रत्येक स्तरावर ई-केवायसीची अंमलबजावणी काटेकोरपणे सुनिश्चित करण्यास सांगितले आहे. प्राथमिक शिक्षण संचालक शरद शंकरगिरी गोसावी आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांच्या हा आदेश काढला आहे.

थोडक्यात

  • शालार्थ प्रणालीतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ई-केवायसी अनिवार्य.

  • ऑगस्ट व सप्टेंबर २०२६ चे वेतन मिळण्यापूर्वी ई-केवायसी पूर्ण करावी लागणार.

  • ई-केवायसी न केल्यास वेतन रोखले जाणार.

  • यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट.

  • सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना तातडीने अंमलबजावणीचे निर्देश.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com