Sharad Pawar Politics : आमचा आणि मनोज जरांगेंचा काहीच संबंध नाही, शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

Sharad Pawar statement on Jarange : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नाशिकमध्ये शिबिर झाले. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना शरद पवारांनी मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी भूमिका स्पष्ट केली आहे.
sharad pawar denies links with manoj jarange
sharad pawar denies links with manoj jarangeSarkarnama
Published on
Updated on

NCP stance on Manoj Jarange Protests: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रविवारी (ता.14) नाशिकमध्ये शिबिर झाले. त्या दरम्यान, शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मनोज जरांगे यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, 'मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाशी आमचा कसलाही संबंध नाही. ज्यांच्याशी आमचा संबंध नाही, त्यांच्याविषयी जास्त बोलणे योग्य नाही.'

आरक्षणाचा प्रश्न सर्वांनी एकत्र येऊन सोडवायला हवा, असे देखील ते म्हणाले. तसेच सरकारने स्थापन केलेल्या उपसमित्यांवर देखील त्यांनी टीका केली. सरकार कुठल्या जातीधर्माचे नाही सरकारने सर्वव्यापक असावे, असे देखील त्यांनी सांगितले.

मराठा आणि ओबीसी उपसमिती सरकारने स्थापन केली आहे. त्याबाबत बोलताना एक समिती एका मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली आणि दुसरी दुसऱ्याच्या अध्यक्षदेखील हे योग्य नाही.समिती एका जातीची करू नका, समाजाची करा. सामाजिक ऐक्य हवे, त्यात अंतर नको, हाच माझ्या सांगण्याचा उद्देश आहे, असे देखील पवार म्हणाले.

sharad pawar denies links with manoj jarange
Laxman Hake Trouble : लक्ष्मण हाकेंना मोठा दणका, मराठा मुलींच्या लग्नाविषयीचे वादग्रस्त वक्तव्य भोवलं, बीडमध्ये कारवाई

भुजबळांचे कान टोचले

मनोज जरांगेंचे नाव न घेता भुजबल म्हणाले होते की काही जणांच्या दादागिरीमुळे मराठा नेते बोलायला तयार नसतात. त्याबाबत शरद पवारांना विचारले असता ते म्हणाले की, आपण व्यापक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. एका जातीचे राजकारण आपल्याला शोभत नाही. ऐक्य ठेवा सामाजिक अंतर वाढेल असे वागू नये.

सरकारची भूमिका फूट पाडणारी

एकनाथ खडसे यांनी आरक्षणाच्या सरकारच्या धोरणावर टीका केली आहे. वातावरण बिघडत आहे. सरकारने वेळीच आरक्षणावर भूमिका स्पष्ट केली असतील तर जातीजातीमध्ये वैमनस्य वाढले नसते. सरकारची भूमिका जातीजातीमध्ये फूट पाडणार आहे ती योग्य नाही.

sharad pawar denies links with manoj jarange
भाजपवासी झालेल्या माजी मुख्यमंत्र्यांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, 'काँग्रेसमध्ये मला त्रास दिला, संपवण्याचा प्रयत्न झाला'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com