

Indurikar Maharaj: कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा झालेला साखरपुडा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. इंदुरीकर महाराज कीर्तनमध्ये प्रबोधन करताना अगदी कमी खर्चामध्ये लग्न सोहळा उरकणे योग्य असल्याचे मार्गदर्शन करताना पाहायला मिळतात. मात्र, त्यांनी त्यांच्या मुलीच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च केल्याने सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका होताना पाहायला मिळत आहे.
टीकेनंतर इंदुरकर महाराज यांनी सुरुवातीला कीर्तन सोडणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी आता आपण मुलीचा लग्न सोहळा आणखी दिमाखात करणार असल्याचे देखील सांगितला आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके हे इंदुरीकर महाराज्यांच्यासाठी मैदानात उतरले असल्याचे पाहिला मिळाले आहे. इंदुरीकर महाराजांनी काही चुकीचं केलं नाही, असं निलेश लंके यांनी सांगितला आहे.
माध्यमांशी बोलताना निलेश लंके म्हणाले, "इंदुरीकरांच्या मुलीचा साखरपुडा झाला तो त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रम होता, ते कीर्तनाबरोबर समाज प्रबोधन करतात आणि समाजापर्यंत विचार पोहोचवण्याचं काम करतात. त्यांनी जर त्यांचा कौटुंबिक कार्यक्रम मोठा केला तर टीकाटिप्पणी करण्याचं कारण नाही. इंदुरीकर महाराज हे कीर्तन करण्यासाठी सबंध महाराष्ट्रभर फिरत असतात त्यामुळे त्यांचा खूप जास्त लोकांशी संपर्क येतो. ती लोक त्यांच्याशी जोडली जातात त्यामुळे ही सर्व लोकं जर त्यांच्या सोहळ्याला येणार असतील तर त्यांच्यासाठी चांगलं जेवण करणं तर आवश्यक आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यामध्ये काही चांगल्या गोष्टी केल्या म्हणून टीका करणे हे योग्य नाही असं निलेश लंके म्हणाले.
त्यांनी जे कीर्तनामधून प्रबोधन करताना लग्नाबाबत जे प्रबोधन केल आहे. ते सामान्य कुटुंबातील गरिबांच्या कुटुंबातील माणसांनी कर्ज काढून लग्न करू नये म्हणजेच रीन काढून सण करू नये असं प्रबोधन त्यांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून केलं आहे. इंदुरीकर महाराज यांची आर्थिक परिस्थिती चांगली असल्यामुळे खर्च केला असेल अनेक उद्योजक आणि राजकीय मंडळी आपल्या कुटुंबातील लोकांची लग्न कोट्यावधी रुपये खर्चून करतात त्यांना लोक काही बोलत नाहीत मात्र एका महाराजांनी आपल्या मुलीचं एवढं मोठ्या प्रमाणात लग्न केलं तर लोक टीका का? करतात असा सवाल निलेश लंके यांनी उपस्थित केला.
साखरपुडा मोठा केला म्हणजे काय केला? तुम्ही समाजात फिरत म्हटल्यावर लोक तर येणारच ना? मग हजार लोक लग्नाला आली असतील म्हणून लग्न मोठं केलं अस म्हणणं चुकीचा आहे. आम्ही चुकीचे समर्थन करत नाही त्यांनी आर्थिक परिस्थितीनुसार कार्यक्रम घेतला असं म्हणत निलेश लंके यांनी इंदुरीकर महाराजांची पाठराखण केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.