Rohit Pawar vs Ram Shinde : 622 मतांचा गॅप भरून काढण्यासाठी राम शिंदेंची तयारी सुरु; तिकडे रोहित पवारांनी दिला दुसरा धक्का

Rohit Pawar Vs Ram Shinde : येत्या 2029 मध्ये 622 मतांचं अंतर भरून काढणारच असा निर्धार करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या पराभवाचा विडा विधानपरिषदेचे सभापती आणि भाजप आमदार राम शिंदे यांनी उचलला आहे.
BJP Ram Shinde vs Rohit Pawar
BJP Ram Shinde vs Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Rohit Pawar Vs Ram Shinde : येत्या 2029 मध्ये 622 मतांचं अंतर भरून काढणारच असा निर्धार करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या पराभवाचा विडा विधानपरिषदेचे सभापती आणि भाजप आमदार राम शिंदे यांनी उचलला आहे. त्याचवेळी त्यांना जामखेड तालुक्यात धक्का बसला आहे.

आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लढलेल्या जामखेड तालुक्यातील कवडगाव-गिरवली सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुरस्कृत पॅनलने विजय मिळविला आहे. त्यानंतर अध्यक्षपदी मिठू खोसे यांची चिठ्ठीद्वारे निवड झाली आहे. यावेळी एक मत बाद होऊन दोन्ही उमेदवारांना समान 6-6 मते पडली. त्यामुळे चिठ्ठीद्वारे मिठू खोसे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

BJP Ram Shinde vs Rohit Pawar
Waqf Amendment Bill : 'वक्फ' बिलाविरोधात ठाकरे गट आक्रमक, पण मतदानावेळी शरद पवारांसह राष्ट्रवादीचे 'ते' 2 खासदार गैरहजर, चर्चांना उधाण

मागील तीन वर्षांपासून ही संस्था राम शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपच्या ताब्यात होती. पण या कार्यकाळात नवीन सभासद पीककर्जापासून वंचित होते. अशा सर्व सभासदांना तत्काळ कर्ज वितरण करण्यात येईल. बँकेच्या विविध कर्ज योजना या शेतकऱ्यांपर्यंत पोचविल्या जातील, असे आश्वास जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमोल राळेभात यांनी दिले आहे.

नवनिर्वाचित अध्यक्ष मिठू खोसे यांचा सत्कार जिल्हा सहकारी बँकेच्या जामखेड येथील लोकनेते सहकार महर्षी जगन्नाथतात्या राळेभात पाटील सभागृहात करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे संचालक सुधीर राळेभात, अभिमन्यू खोसे, सखाराम भोरे, नाना आढाव, वसिष्ठ खोसे, पप्पू खोसे, युवराज खोसे यांच्यासह चोरखले, हरिश्चंद्र भोईटे, सीताराम कांबळे, संगीता नन्नवरे, महादेव भोरे उपस्थित होते.

BJP Ram Shinde vs Rohit Pawar
Waqf Amendment Bill : अखेरच्या क्षणी राष्ट्रवादीचा स्टॅन्ड क्लिअर; बाळासाहेब ठाकरेंच नाव घेत प्रफुल्ल पटेलांचं खणखणीत भाषण

2029 मध्ये 622 मतांचं अंतर भरून काढणारच :

घरात 4 वेळा मुख्यमंत्री, पाच वेळा उपमुख्यमंत्री, देशाचे संरक्षण मंत्री, कृषिमंत्री, लोकसभेतील विरोधी पक्षनेते, विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि पक्ष फुटला तरी घरात 3 खासदार, 2 आमदार त्यांच्याबरोबर माझी लढत आणि माझ्या किमतीपेक्षा त्यांची किमत 622 मतांनी जास्त आहे. येत्या 2029 ला 622 चं मार्जिन कव्हर करायचं आहे. त्यांचा राजकारणाचा इतिहास 60 वर्षांचा आहे, आपलं काय, असे सांगून विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी रोहित पवार यांचा पराभव करण्याचा विडा उचलला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com