Sharad Pawar News : तिकीट मिळण्यापासून निवडून येईपर्यंत करावा लागला होता संघर्ष!

Maharashtra Political News : शरद पवारांनी पहिल्यांदा आमदारकीची शपथ घेतली, तो दिवस म्हणजे 22 फेब्रुवारी 1967. आज त्याला 57 वर्षे पूर्ण झाली.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : विधानसभेची पहिलीच निवडणूक... तिकीट मिळण्यापासूनच संघर्षाला सुरुवात होते... पण तिकीट मिळाल्यानंतर लोकंच निवडणूक हातात घेतात आणि मोठ्या मताधिक्याने एका तरुणाला विधानसभेत पोहोचवतात. त्यांचं नाव शरद पवार. पवारांनी पहिल्यांदा आमदारकीची शपथ घेतली, तो दिवस म्हणजे 22 फेब्रुवारी 1967. आज त्याला 57 वर्षे पूर्ण झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक नेत्यांनी या आठवणींना आज उजाळा दिला. (Sharad Pawar News)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर दोन गट झाले. निवडणूक आयोगासह विधानसभा अध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा असल्याचा निकाल दिला, तर शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) हे नाव मिळाले आहे. काही दिवसांत चिन्हही मिळेल. लोकसभेच्या तोंडावर या घडामोडी घडल्याने ही निवडणूक दोन्ही गटांसाठी महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे शरद पवारांच्या बारामतीतील पहिल्या निवडणुकीची आठवण सांगत अनेक नेत्यांनी जणू विरोधकांना पवारांच्या संघर्षाची आठवण करून दिली आहे.

Sharad Pawar
Lok Sabha Election 2024 : दोन्ही राष्ट्रवादीत रंगलाय कलगीतुरा; दुपारी रोहित पवारांचा हल्ला, रात्री तटकरेंचा प्रतिहल्ला

खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आपल्या एक्स हँडलवर म्हटले आहे की, कसलीही पार्श्वभूमी नसताना एक तरुण निवडणूक लढविण्याचा निश्चय करतो. गावागावात त्याची चर्चा होते. बघता बघता लोकंच ती निवडणूक हातात घेतात आणि तो तरुण मोठ्या मताधिक्याने विधानसभेत पोहोचतो. त्या मतदारसंघाचे नाव बारामती आणि तो तरुण म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब! त्यांनी पहिली निवडणूक जिंकली त्याला आज 57 वर्षे पूर्ण झाली. आपण सर्वांनी आदरणीय पवारसाहेबांना दिलेली साथ आणि त्यांच्यावर केलेलं प्रेम खूप मोलाचे आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एका प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात

आजच्याच दिवशी 57 वर्षांपूर्वी आदरणीय शरद पवारसाहेबांनी बारामती विधानसभा मतदारसंघाची निवडणूक जिंकत एका प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात केली होती. साहेबांच्या भाषणातून आणि संभाषणातून या निवडणुकीचे किस्से ऐकले आहेत. ही निवडणूक काही सोप्पी नव्हती, तिकीट मिळण्यापासून निवडून येईपर्यंत मोठा संघर्ष करावा लागला होता, असं साहेब सांगतात. पण हार मानणार ते साहेब कसले! साहेबांनी उमेदवारी मिळवली आणि जिंकलीही. ही निवडणूक संघर्ष करणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणा देणारी ठरली. संघर्ष करून मिळालेलं यश हे चिरकाल टिकतं हे या निवडणुकीने दाखवले, असे जयंत पाटील (Jayant Patil) यांनी म्हटले आहे.

झंझावाती प्रवास आजही सुरू

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या एक्स हँडलवर म्हटले आहे की, पुरोगामी विचारांचा वारसा जपत गेली 57 वर्षे अखंड लोकसेवेस वाहून घेणारे महाराष्ट्राचे सह्याद्री म्हणजे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवारसाहेब होय. पवारसाहेबांनी 22 फेब्रुवारी 1967 रोजी म्हणजे आजच्याच दिवशी पहिल्यांदा आमदार होत आपल्या संसदीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. 57 वर्षांपूर्वी सुरू झालेला हा झंझावाती प्रवास आजही अथक सुरू आहे. शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी प्रत्येकालाच पवारसाहेब जवळचे वाटतात.

R

Sharad Pawar
Rashmi Shukla News : पोलिस अधिकाऱ्यांच्या चमकोगिरीला रश्मी शुक्लांचा लगाम!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com