Mumbai News : देशाचे संरक्षण मंत्री असताना शरद पवार यांनी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले होते. त्यांनी घेतलेल्या या महत्वपूर्ण निर्णयाचा फायदा सैन्य दलाला मोठ्या प्रमाणात होत आहे. आपल्या सैन्यदलाची कामगिरी पाहून अभिमान वाटतो. विशेषतः आता सैन्यदल केवळ पुरुषांच्या नव्हे तर महिलांच्याही हाती आहे, त्यांचे कर्तुत्व आज आपल्याला बघायला मिळत आहे हे पाहून आनंद होतो, असे सांगत त्यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंह यांनी माहिती दिली होती. याचाच धागा पकडत ज्येष्ठ नेते शरद पवारांनी संरक्षण मंत्री असताना तीन दलाच्या लष्कर प्रमुखांचा विरोध डावलून आपण महिलांना लष्करामध्ये भरती करण्यासाठी घेतलेल्या मोठ्या निर्णयाच्या आठवणीला उजाळा दिला.
सातारा येथे शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 66 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये उपस्थितांना शरद पवारांनी (Sharad Pawar) संबंधित केले. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून 'ऑपरेशन सिंदूर' करत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर 7 मे ला एअर स्ट्राईक केले होते. त्यानंतर पाकिस्ताने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा प्रयत्न भारताने हाणून पाडला होता.
भारताकडून करण्यात आलेल्या हल्ल्याची माहिती सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंह यांनी माहिती दिली होती. या दोन्ही महिलांनी ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती दिली. यामुळे ज्येष्ठ नेते शरद पवारांनी संरक्षण मंत्री असतानाचा आपण महिलांना लष्करामध्ये भरती करण्याबाबत घेतलेल्या मोठ्या निर्णयाची आठवण करून दिली.
मला आठवते, संरक्षण मंत्री असताना दर सोमवारी सकाळी नऊ वाजता मंत्रालयात एक बैठक होत असे. त्या बैठकीत आर्मी, नेव्ही, एअर फोर्सचे प्रमुख, परराष्ट्र सचिव आणि संरक्षण सचिव सहभागी होत. मी एकदा सुचवले की लष्करात महिलांनाही संधी दिली पाहिजे. तीनही दलांचे प्रमुख म्हणाले की हे शक्य नाही. मी त्यांना विचार करण्यास सांगितले. पुढील तीन बैठकांनंतरही त्यांनी नकार दिला, आणि चौथ्या बैठकीत मी स्पष्टपणे सांगितलं की देशाच्या संरक्षणविषयक निर्णय घेण्याचा अधिकार जनतेने मला दिला आहे. त्यामुळे इथून पुढे भारताच्या सैन्यात किमान नऊ टक्के महिला असतील आणि त्यांना संधी दिली जाईल, असे यावेळी शरद पवार यांनी सांगितले.
पाकिस्तानच्या सीमेवर घडणाऱ्या घटनांचे विश्लेषण करणाऱ्या दोन महिला आहेत, त्यातील एक बेळगावमधील आणि मुस्लिम समाजातील आहे. याचा अर्थ असा की या देशात धर्म, जात, लिंग या गोष्टी गौण आहेत. देशाच्या संरक्षणासाठी सर्वजण कटिबद्ध असल्याचे शरद पवार म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.