शरद पवार-उद्धव ठाकरेंना भेटणार; भाजपविरोधात नव्याने मोर्चेबांधणी

या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Sharad Pawar-Uddhav Thackeray
Sharad Pawar-Uddhav ThackeraySarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे उद्या (ता. १८ ऑक्टोबर) सकाळी साडेदहा वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीत भारतीय जनता पक्षाविरोधात लढण्यासाठी नव्याने मोर्चेबांधणी करण्यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाआघाडीच्या नेत्यांना लक्ष्य केले जात आहे, त्या मुद्यावरही या दोन्ही नेत्यांमध्ये बोलणे होऊ शकते. (Sharad Pawar will meet Chief Minister Uddhav Thackeray tomorrow)

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचे नेते आणि भाजप नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. त्यातच केंद्रीय तपास यंत्रणांकडून आघाडीच्या नेत्यांच्या मागे चौकशीच्या ससेमिरा लावला आहे. तसेच, फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला पवारांनी उत्तर दिले होते. या घटनांच्या पार्श्वभूमीवर उद्या होणाऱ्या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Sharad Pawar-Uddhav Thackeray
पिंपरीत भाजपकडून सत्तेचा गैरवापर; राष्ट्रवादीला पुन्हा सत्ता द्या : शरद पवार

दसरा मेळाव्यातील भाषणानंतर भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘उद्धव ठाकरे यांनी भाबडेपणाचा बुरखा सोडून द्यावा, त्यांना मुख्यमंत्री व्हायचे होते,’ असा हल्लाबोल केला होता. फडणवीस यांनी थेट हल्ला करताच, ‘उद्धव ठाकरे यांना मी मुख्यमंत्री होण्याचा आग्रह केला होता,’ असे विधान करीत शरद पवारांनी आपण त्यांच्यासमवेत ठामपणे उभे आहोत, असा संदेश पिंपरीच्या चिंचवडच्या पत्रकार परिषदेत दिला होता.

Sharad Pawar-Uddhav Thackeray
शरद पवार हे देशातील मोठे नेते, त्यांच्या टीकेला उत्तर देण्याएवढा मी मोठा नाही : लांडगे

पिंपरी चिंचवडच्या दोन दिवसांच्या दौऱ्यानंतर मुंबईत परतल्यावर ज्येष्ठ नेते शरद पवार लगेच वर्षा बंगल्यावर जाणार आहेत. ते सकाळी साडेदहा वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतील. भाजपविरोधात आपण दोघे एक आहोत, हा संदेश देण्यासाठी ही बैठक होणार असल्याचे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्ते आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

प्राप्तीकर विभाग (इन्कम टॅक्स) आणि अंमलबजावणी संचनालयाची (ईडी) छापेमारी ही राजकीय हेतूने असल्याचे विधान दोन्ही नेत्यांनी केले आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हे दोन्ही पक्ष एकत्र येतात काय, ते पाहणेही महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com