Shivrajybhisek Sohla News : शिवराज्याभिषेक सोहळ्याला आचारसंहितेची आडकाठी; सरकार मार्ग काढणार? संभाजीराजे म्हणाले...

Political News : शिवराज्याभिषेक सोहळा हा राष्ट्रीय उत्सवाप्रमाणे साजरा करण्यात यावा, यासाठी राज्य सरकारने लक्ष घालावे, अशी मागणी केल्याचे संभाजीराजे छत्रपतींनी सांगितले.
Chhatrapati Sambhaji Raje
Chhatrapati Sambhaji RajeSarkarnama

Pune News : राज्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता 10 जूनपर्यंत आहे. 6 जूनला 350 वा शिवराज्यभिषेक सोहळा होणार आहे. त्या सोहळ्याची जोरदार तयारी पुण्यातून करण्यात येणार आहे. त्यामुळे शिवराज्याभिषेक सोहळा हा राष्ट्रीय उत्सवाप्रमाणे साजरा करण्यात यावा, यासाठी राज्य सरकारने लक्ष घालावे, अशी मागणी केल्याचे संभाजीराजे छत्रपतींनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात या सोहळ्याची जोरदार तयारी करण्यात येत असून याबाबत माध्यमांशी संभाजीराजे छत्रपतींनी (Sambhajiraje Chatrpati) संवाद साधत ही माहिती दिली. किल्ले रायगड येथे अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा (Shivrajybhisek Sohla) महोत्सवसमितीतर्फे ६ जूनला साजऱ्या होत असलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीसाठी राजव्यापी बैठक पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस युवराज संभाजीराजे छत्रपती, संयोगिताराजे छत्रपती, युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती उपस्थित होते.

Chhatrapati Sambhaji Raje
Thane Election Voting LIVE: बोगस मतदानासाठी लोक आणून ठेवलेत; ठाकरे गटाचे उमेदवार भडकले

या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले, ६ जूनला ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा होणार आहे. त्या सोहळ्याची जोरदार तयारी पुण्यातून करण्यात येणार आहे. हा सोहळा वैविध्यपूर्ण कार्यक्रमाने साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी शिवभक्तांच्या सूचना मागविण्यात आल्या आहेत. त्यामुळे सरकारने या प्रकरणात मार्ग काढण्याची गरज आहे.

शिवराज्याभिषेक सोहळा वर्ष पूर्ततेचे हे वर्ष आहे. रायगड जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता १० जूनपर्यंत आहे. त्यामुळे थोड्या अडचणी येत आहेत. हा सोहळा दिमाखदारपणे साजरा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली आहे. या सोहळ्यासाठी गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात निधी आला होता. यंदा देखील त्याच प्रमाणे अपेक्षा असल्याचे राजेंनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सोहळा राष्ट्रीय उत्सवाप्रमाणे साजरा करावा

यावर्षी देखील हा सोहळा मोठ्या उत्साही वातवरणात साजरा करण्यात येणार आहे. शिवभक्त सोयी सुविधांपासून वंचित राहू नये, यासाठी उपाययोजना कराव्या लागणार आहेत. त्या सुविधा सरकारी पातळीवर राबवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. हा सोहळा राष्ट्रीय उत्सवाप्रमाणे साजरा करण्यासाठी लक्ष घालावे, अशा मागणी राजेंनी केली आहे.

Chhatrapati Sambhaji Raje
Chhatrapti Sambhjiraje News : 'मुंबई, दिल्लीला न जाता...'; संभाजीराजेंची शाहू महाराजांसाठी खास पोस्ट

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com