Eknath Shinde Lawyers : उद्धव ठाकरेंच्या विरोधात एकनाथ शिंदेंची वकिलांची फौज, सुप्रीम कोर्टात बाजु मांडणारे रोहतगी, कौल कोण?

Shiv Sena Party Symbol Hearing Mukul Rohatgi : शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी आज हायकोर्टात होणार आहे. ठाकरेंच्या वकिलांचा युक्तिवाद संपल्यानंतर आता एकनाथ शिदेंचे वकील युक्तिवाद करणार आहेत.
 Eknath Shinde Mukul Rohatgi Neeraj Kishan Kaul
Eknath Shinde Mukul Rohatgi Neeraj Kishan Kaul sarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू आहे. उद्धव ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी जोरदार युक्तीवाद करत आपली बाजु मांडली होती. आता एकनाथ शिंदेंच्या वकिलांकडून युक्तिवाद केला जाणार असून ठाकरेंकडून मांडलेले मुद्दे खोडून काढले जाणार आहेत.

शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणीसाठी एकनाथ शिंदेंनी नामांकित वकिलांची फौजच उभी केली आहे. शिवसेनेकडून वरिष्ठ वकील नीरज किशन कौल, हरीश साळवे, महेश जेठमलानी, मनिंदर सिंग, अभिकल्प प्रताप सिंग यांनी यापूर्वीच्या सुनावणीमध्ये शिंदेंकडून बाजू मांडली होती.

आजच्या सुनावणीमध्ये मुकुल रोहतगी, निरज किशन कौल हे युक्तीवाद करणार आहेत. पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदेंचेच कसे आहे, यावर युक्तिवाद करतील. आणि यापूर्वी कपिल सिब्बल यांनी मांडलेले मुद्दे खोडून काढतील.

मुकुल रोहतगी हे माजी अ‍ॅटर्नी जनरल आणि प्रसिद्ध वकील आहेत. 2014 ते 2017 या काळात ते अ‍ॅटर्नी जनरल होते. गुजरात दंगलीनंतर त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची बाजु न्यायालयात मांडली होती.फेक एन्काऊंटर ते बेस्ट बेकरी आदी प्रकरणे त्यांनी न्यायालयात लढली.

 Eknath Shinde Mukul Rohatgi Neeraj Kishan Kaul
Shivena hearing : शिवसेना पक्ष, चिन्हावर सुनावणी सुरू होण्यापूर्वीच दिल्लीतून एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण' संदर्भात मोठं वक्तव्य

निरज किशन कौल कोण?

रोहतगी यांच्यासोबत शिंदेंची बाजु न्यायलयात मांडणारे निरज किशन कौल हे नामांकित वकील आहेत. केंद्र सरकारचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून देखील त्यांनी काम पाहिले असून 2014 ते 2017 या काळात त्यांनी सरकारची बाजु न्यायलायत मांडली आहे.

 Eknath Shinde Mukul Rohatgi Neeraj Kishan Kaul
Shivena hearing : शिवसेना पक्ष, चिन्हावर सुनावणी सुरू होण्यापूर्वीच दिल्लीतून एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण' संदर्भात मोठं वक्तव्य

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com