Anil Parab: योगेश कदमांविरोधात अनिल परब पुन्हा मैदानात : घायवळ प्रकरणात थेट PM मोदींचं नाव घेत फडणवीसांनाही पकडलं कोंडीत

Anil Parab Targets Minister Yogesh Kadam: गुंड निलेश घायवळ यांच्या भावाला शस्त्र परवाना दिल्यावरून आता राज्यातील राजकारण चांगलेच तापलेलं आहे. यावरून गृहराज्यमंत्री, महसूल राज्यमंत्री योगेश कदम आता अडचणीत आले आहेत.
Anil Parab And Minister Yogesh Kadam
Anil Parab And Minister Yogesh KadamSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. शिवसेना नेते अनिल परब यांनी योगेश कदम यांच्यावर शस्त्र परवाना प्रकरणात थेट हल्ला चढवत पंतप्रधान मोदींचं नाव घेतलं आहे.

  2. सचिन घायवळ प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा तापलं आहे.

  3. शिंदे आणि उद्धव गटातील जुनी वैरं या प्रकरणामुळे पुन्हा उफाळून आली आहेत.

Sachin Gaiwal News : कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला दिलेल्या शस्त्र परवान्यावरून गृहराज्यमंत्री योगेश कदम पुन्हा अडचणीत आले आहेत. कदम यांनी पुणे पोलिसांचा विरोध डावलून मंत्रालयीन स्तरावर घायवळला शस्त्र परवाना दिल्याचे बोलले जाते. यावरून त्यांच्यावर आरोप होत असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी कदम यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे.

अनिल परब म्हणाले, राज्याला नेहमी कलंकित करणारे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे अनेक कारनामे आतापर्यंत आपण बाहेर काढले आहेत. आता पुन्हा त्यांचे नाव घायवळ प्रकरणात समोर आले आहे. तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना वाचवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच घातलेली अट मोडून कदम काम करत असल्याचा हल्लाबोल परब यांनी केला आहे.

कदम यांच्या प्रकरणांची पोलखोल करून आपण पुराव्यासकट जनतेसमोर, विधानपरिषदेच्या माध्यमातून सरकार समोर ठेवली होती. मात्र मुख्यमंत्र्यांची अडचण माहीत नाही. पण त्यांनी प्रत्येकवेळी त्यांना पाठीशी घातलं.

मंत्र्याने काही केलं तरी चालतं आमचं त्यांना अभय आहे, असा संदेश यातून जातो. एकनाथ शिंदे यांनी खेडच्या सभेत जाऊन योगेश तुझ्या पाठीशी आहे असे म्हटलं होतं. तुला काळजी करायचं कारण नाही, अशा विश्वास दिला होता. ज्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पाठीशी असण्याची भावना तयार होते. तेव्हाच असे काम होत असल्याचा दावाही परब यांनी केला.

परवाना देताना अर्धन्यायिक जज असणाऱ्या योगेश कदम यांनी, पोलिसांनी अर्ज नाकारलेली कारणे बाजूला ठेवली. त्यांनी, आपल्या जजमेंटमध्ये आदेश पारित करताना, घाळवळ हे सज्जन असून पैशांची ने-आण करण्यासाठी शस्त्रपरवान्याची गरज आहे असल्याचे नमूद केले. पण ती रक्कम किती तर लाखोंची त्यामुळे त्यांनी देशाचे पंतप्रधान यांनीच घालून दिलेल्या अटीचा भंग केला.

Anil Parab And Minister Yogesh Kadam
Yogesh Kadam : 'पोलिसांच्या अहवालानुसारच...', गुंड निलेश घायवळच्या भावाला शस्त्र परवाना दिल्याच्या प्रकरणावर गृहराज्यमंत्री योगेश कदमांची पहिली प्रतिक्रिया

मोदींच्या आदेशाप्रमाणे 2 लाखांपेक्षी अधिकची रक्कम घेवून जाण्याची परवानगी नाही. तर घेवून जाण्यासाठी बँकेचा परवाना लागतो. तर येथे घाळवळ याने मला लाखोंची कॅश ने-आण करावी लागते. त्यासाठी शस्त्र परवाना मागितला. ही लाखों रूपये आले कोठून, ते कोणाचे, ते कोणाला दिले जातात, असे प्रश्नही परब यांनी यावेळी उपस्थित केले आहेत.

याचवेळी परब यांनी, पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गँगवार सुरू आहे. कोयता गँग आहे. पुणे जिल्ह्यात 70 गँग कार्यरत आहेत. खंडणी, खून, दरोडेखोरी, खुनाचे प्रयत्न हे प्रकार सर्रास घडत आहेत. हे करण्यासाठी जे लागत, म्हणजे सरकारचं पाठबळ आयतं मिळतं, हे सिद्ध झालंय” असाही घणाघात केला आहे. तसेच कदम यांनी मुख्यमंत्र्यांनी पाठीशी न घालता त्यांच्यावर कारवाई करावी, त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे.

Anil Parab And Minister Yogesh Kadam
Yogesh Kadam : मंत्री योगेश कदमांचा पाय खोलात : एका सहीने केली अडचण, प्रकरण अंगाशी येणार?

FAQs :

प्र.1: अनिल परब यांनी कोणावर आरोप केले आहेत?
👉 त्यांनी मंत्री योगेश कदम यांच्यावर शस्त्र परवाना प्रकरणात आरोप केले आहेत.

प्र.2: हे प्रकरण कोणत्या गुंडाशी संबंधित आहे?
👉 हे प्रकरण पुण्यातील कुख्यात गुंड सचिन घायवळ याच्याशी संबंधित आहे.

प्र.3 : योगेश कदम कोणत्या पक्षाचे नेते आहेत?
👉 ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री आहेत.

प्र.4: या प्रकरणामुळे काय परिणाम होऊ शकतात?
👉 राज्यात राजकीय संघर्ष वाढण्याची शक्यता असून, तपासाची मागणी होऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com