Eknath Shinde: शिवसेनेच्या बड्या नेत्यांनी सांगितले थेट नाशिकच्या नव्या पालकमंत्र्यांचे नाव; केवळ घोषणा बाकी ?

Shiv Sena leader announcement : शनिवारी रात्री पालकमंत्रिदाचे वाटप करण्यात आले, त्याला 24 तास उलटत असतानाच रविवारी दोन पालकमंत्री हे औटघटकेचे पालकमंत्री ठरले आहेत.
Eknath Shinde
Eknath Shinde sarkarnama
Published on
Updated on

Nashik News : राज्य सरकारने शनिवारी रात्री उशिरा पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली, यामध्ये अनेक मंत्र्यांना पालकमंत्रिपदापासून वंचित ठेवण्यात आले होते. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पालकमंत्रिपदाच्या जबाबदाऱ्यांचे वाटप करताना भाजपच्या सर्व मंत्र्यांचा पालकमंत्रिपद देत महायुतीत पुन्हा आपली ताकद दाखवून दिली होती. दुसरीकडे या पालकमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नाराजी पसरली होती. शनिवारी रात्री पालकमंत्रिदाचे वाटप करण्यात आले, त्याला 24 तास उलटत असतानाच रविवारी दोन पालकमंत्री हे औटघटकेचे पालकमंत्री ठरले आहेत.

त्यांच्या निवडीला स्थगिती देण्यात आली. त्यातच नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये सुरू असलेले वादाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे नेते अजय बोरस्ते यांनी मोठे विधान केले आहे. त्यामुळे त्यांच्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे

Eknath Shinde
Narendra Modi: PM मोदींच्या कानमंत्रांनंतरही 'स्थानिक'साठी राष्ट्रवादी, भाजपमधील काही नेत्यांनी आळवला स्वबळाचा सूर

महायुतीतील पालकमंत्रिपदवरून वाद चव्हाट्यावर आल्यानंतर राज्य सरकारने रायगड आणि नाशिक पालकमंत्रिपदाला स्थगिती दिली आहे. या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची माळ कुणाच्या गळात पडणार, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रिपद देण्याला गोगावले यांचा तर नाशिकमध्ये गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना पालकमंत्रिपद दिल्याने दादा भुसे नाराज आहेत. त्यानंतर रविवारी रात्री महायुतीत मोठ्या घडामोडी घडल्या अन रायगड आणि नाशिक पालकमंत्रिपदाला स्थगिती दिली आहे.

Eknath Shinde
Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांचा राजीनामाच 'राष्ट्रवादी' अन् त्यांच्या हिताचा!

त्यानंतर आता शिवसेना उपनेते तथा जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांचं मोठं विधान केले आहे. त्यांनी नाशिकच्यापालकमंत्री दादा भुसे? यांची वर्णी लागणार असल्याचे सांगितले. याबाबत लवकरच नाशिकसाठी गुड न्यूज ऐकायला मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Eknath Shinde
Dhananjay Munde Statement : 'शपथविधी षडयंत्र' या मुंडेंच्या दाव्याचे पडसाद; तटकरेंकडून सावरासावरी, तर पाटील म्हणाले, 'समजून घ्या!'

नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये सुरू असलेले वादाच्या पार्श्वभूमीवर अजय बोरस्ते यांच्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे. लवकरच एकनाथ शिंदे योग्य तो निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले. याबाबतची घोषणा लवकरच होणार असल्याचे स्पष्ट केले. कालच नाशिक आणि रायगडाच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर अजय बोरस्ते यांच्या विधानामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Eknath Shinde
NCP on Mahayuti : सरकारची ‘कामे कमी आणि नखरे जास्त’ राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याकडून महायुती सरकारवर टीकास्त्र

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com