Shivsena News : भास्कर जाधवांची औकात नसताना 1995 मध्ये बाळासाहेबांना तिकीट द्यायला लावले; शिवसेनेच्या नेत्याचा हल्लाबोल

Balasaheb Thackeray ticket issue News : 2009 साली झालेल्या निवडणुकीत त्यांच्या विरोधकांने विजयासाठी अघोरी पूजा केल्याचा दावा भास्कर जाधव यांनी केला होता.
Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhav Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी राजकारणातून संन्यास घ्यावा वाटतो, असे स्पष्ट केले होते. आठ निवडणुका जिंकल्यानंतर त्यांनी आता थांबण्याचा निर्णय घेतल्याने जोरात चर्चा सुरु झाली आहे. त्याचवेळी दुसरीकडे जाधव यांनी त्यांच्या विरोधकांवर हल्लबोल केला. त्यामुळे रत्नागिरी जिल्हयातील वातावरण तापले आहे. 2009 साली झालेल्या निवडणुकीत त्यांच्या विरोधकांने विजयासाठी अघोरी पूजा केल्याचा दावा भास्कर जाधव यांनी केला होता. या त्यांच्या वक्तव्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते व माजी मंत्री रामदास कदम यांनी जोरदार पलटवार केला आहे.

जाधव यांच्या या वक्तव्यानंतर आता रामदास कदम (Ramdas Kadam) चांगलेच आक्रमक झाले आहेत, त्यांनी जाधव यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. भास्कर जाधव जे बोलले तेवढी त्यांची औकात नाही, एवढा मोठा माणूस तो नाही. 1995 आणि 2000 मध्ये मीच बाळासाहेब ठाकरे यांना सांगून त्यांना तिकीट द्यायला सांगितले होते. त्यानंतर बाळासाहेबांनी उमेदवारी दिली होती. त्यानंतर तो निवडून आला होता, असे कदम म्हणाले.

Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhav : दाल मे कुछ काला, या...! आठवेळा निवडणूक जिंकल्यानंतर जाधवांना राजकारण सोडण्याची आताच उपरती का ?

भास्कर जाधव (bhaskar jadhav ) यांचा नौटंकी करण्यात कोणी हात पकडू शकत नाही. काळी विद्या करून तुम्ही आणि तुमचे कुटुंब दमले आहे, भास्कर जाधव हे खोटारडे आहेत. एखाद्या व्यक्तीला बदनाम कसे करायचं हे भास्कर जाधव यांच्याकडू शिकावे अशा शब्दांत त्यानी टीका केली.

Bhaskar Jadhav
NCP vs Shivsena : नवी मुंबईसाठी अजितदादांची फिल्डिंग; काँग्रेसला धक्का देत, शिंदेंच्या शिवसेनेला डिवचलं

एकनाथ शिंदे 40 आमदार घेऊन सुरतला गेले होते. तेव्हा भास्कर जाधव हे पण सुरतपर्यंत आले होते. त्यावेळी सुरतच्या बॉर्डरपर्यंत जावून आले. पण एकनाथ शिंदे यांनी त्यांना सांगितले होते तुम्ही येवू नका. भास्कर जाधव नौटंकी करत आहेत. उद्धव ठाकरेंकडे येऊन चूक केली असे ते म्हणतात, असेही कदम म्हणाले.

Bhaskar Jadhav
Tejaswi Ghosalkar : तेजस्वी घोसाळकरांनी फेरलं भाजपच्या मनसुब्यावर पाणी; संचालक होताच थेट मातोश्रीवर...

गुहागरची जनता आता भास्कर जाधव यांना संन्यास देणार आहे, ते फक्त 1200 मतांनी निवडून आलेले आहेत, अशी टीका कदम यांनी केली. दरम्यान कदम यांच्या या आरोपांनंतर आता आरोप- प्रत्यारोपाचे राजकारण रंगणार आहे. त्यामुळे आता येत्या काळात कदम यांच्या टीकेला जाधव काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bhaskar Jadhav
Abu Azmi Controversial Statements : 'अबू आझमी यांच्या वारी संदर्भातल्या वक्तव्यामुळे दंगल झाली तर...'अल्पसंख्यांक आयोगाचा आक्रमक पवित्रा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com