Neelam Gorhe News : ठाकरेंच्या दोन नेत्यांचा नीलम गोऱ्हेंबाबत मोठा गौप्यस्फोट; संपर्कनेत्या असताना काय-काय केलं?

Vinayak Pandey Ashok Haranawal Sanjay Raut Shiv Sena UBT : विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला होता.
Neelam Gorhe, Ashok Haranawal, Vinayak Pandey
Neelam Gorhe, Ashok Haranawal, Vinayak PandeySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेत्यांनी आता गंभीर आरोप केले आहेत. गोऱ्हे यांनी ठाकरेंवर मर्सिडीजबाबत केलेल्या आरोपांनंतर हे नेतेही तुटून पडले आहे. खासदार संजय राऊत यांनी पक्षातील दोन नेत्यांची नावे घेत गोऱ्हे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

संजय राऊत यांनी आज नीलम गोऱ्हेंवर गंभीर आरोप केले. त्यांचे कालचे विधान म्हणजे विकृती आहे. काही लोकांच्या मर्जीमुळे त्या पक्षात आल्या आणि ताटात घाण करून गेल्या. विधान परिषदेत कोणाकोणाच्या नावावर पैसे जमा केले, असा आरोप राऊतांनी केला. यावेळी राऊतांनी नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे आणि पुण्यातील माजी नगरसेवक अशोक हरणावळ यांचाही उल्लेख केला. उमेदवारीसाठी त्यांच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप राऊतांनी केला.

Neelam Gorhe, Ashok Haranawal, Vinayak Pandey
Congress : पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, धंगेकरांचा शिवसेना प्रवेश निश्चित; पुणे काँग्रेसला कोण सावरणार?

हरणावळ यांनी सांगितले की, त्यांनी काल केलेला आरोप अतिशय चुकीचा आहे. ज्या मातोश्रीमुळे आपण पदे भूषविली आहेत. त्यांच्याबाबत तक्रार करणार असाल तर माझ्याकडे इतिहास आहेत. मी बाळासाहेब ठाकरेंच्या काळात नगरसेवक होतो. गटनेता होतो. नीलम गोऱ्हे आणि गजानन कीर्तीकर आमची कार्यपत्रिकाही तपासून घ्यायचे. हे संपर्कनेत्यांचे काम नसते.

आमच्या साहेबांविषयी काही बोलले तर त्यांचे सर्व बाहेर काढू, तुमची कुंडली माझ्याकडे आहे, असा इशारा हरणावळ यांनी दिला. आर्थिक देवाणघेवाण झाल्याचेही मान्य करत हरणावळ यांनी अधिक भाष्य करणे टाळले. राऊतांच्या खुलाश्यानंतर पांडे यांनीही त्याला दुजोरा दिला. पांडे यांनी आपल्याकडून पैसे घेतल्याचे थेट आरोप केले.

Neelam Gorhe, Ashok Haranawal, Vinayak Pandey
Sanjay Raut: नीलम गोऱ्हे निर्लज्ज बाई; राऊतांचा हल्लाबोल; 'राजकीय कुंडली'च मांडली... VIDIO पाहा

पांडे म्हणाले, उद्धवसाहेबांनी माझ्याकडून पदासाठी कधीही एक रुपयाही मागितला नाही. चांगला कार्यकर्ता म्हणून मला पदे मिळाली. पण विधानसभा निवडणुकीसाठी ताईंनी माझ्याकडून पैसे घेतले होते. राज्यातील अनेक कार्यकर्ते हे सांगतील. त्या ज्या ठिकाणी संपर्कनेत्या होत्या तिथे ही स्थिती होती. कार्यकर्त्यांना त्या मातोश्रीपर्यंत पोहचू देत नव्हत्या.

तिकीटासाठी स्पर्धा होती. त्यामुळे ते पैसे घ्यायच्या. शंभर टक्के तिकीटाचे करू देते, असे त्या म्हणाल्या होत्या. त्यांना पैसे दिले. पण मला तिकीट मिळालं नाही. त्यानंतर मी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यांनी दिले नाहीत म्हणून मी पत्रकार परिषद घेईन, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी आमदार निवासात बोलवून काही पैसे त्यांनी मला परत दिले, असा दावा पांडे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com