Mahayuti Leader : धंगेकरांपाठोपाठ आणखी एका नेत्यानं केली फडणवीस, शिंदेसह अजितदादांची कोंडी; विरोधकांना दिलं बळ...

Sanjay Gaikwad Raises Concern Over Fake Voters in Buldhana : काही लोकं, अधिकारी इथून गेलेले 30-30 वर्षे झाली तरी त्यांची नावे मतदारयादीत आहेत. हा आकडा जिल्ह्यात एक लाखांहून अधिक असेल, असे संजय गायकवाड यांनी सांगितले.
Eknath Shinde | Ajit Pawar | Devendra Fadnavis
Eknath Shinde | Ajit Pawar | Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Opposition Gains Momentum Over Election Integrity Debate : राज्यातील विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने मंगळवार आणि बुधवारी निवडणूक आयोगांच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. त्यानंतर नेत्यांनी पत्रकार परिषद घेत बोगस मतदार, याद्या, निवडणूक प्रक्रिया आदी मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. त्यावरून सत्ताधाऱ्यांनी या नेत्यांवर टीकेची झोड उठवली होती. पण 24 तासांतच सत्ताधारी महायुतीतील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी विरोधकांच्या सुरात सूर मिसळले आहेत.

पुण्यातील माजी आमदार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेते रविंद्र धंगेकर यांच्याकडून शहरातील गुन्हेगारीवरून भाजप नेत्यांवर थेट आरोप केले जात आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या बॉसशी बोलेन, असे उत्तर मीडियाशी बोलताना दिले होते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपण आता महायुतीत असल्याचे विसरू नये, असा सल्ला धंगेकरांनी दिला होता. त्यानंतर गायकवाड यांनीही महायुतीच्या नेत्यांना अडचणीत टाकले आहे.

विरोधकांनी आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर सत्ताधारी नेत्यांनी त्याची खिल्ली उडवली होती. आता आमदार गायकवाड यांनीही बोगस मतदारांवरून थेट निवडणूक अधिकारी दिनेश वाघमारे यांनाच फोन केल्याचे सांगितले आहे. मीडियाशी बोलताना ते म्हणाले, बुलढाण्यामध्ये जवळपास 4 हजार दुबार मतदारांची नावे जिल्हाधिकाऱ्यांना यापूर्वी लेखी कळवले आहे. निवडणूक अधिकारी दिनेश वाघमारे यांनाही फोनवरून बोगस नावांबाबत काल बोललो आहे.

Eknath Shinde | Ajit Pawar | Devendra Fadnavis
Raj Thackeray News : 'मविआ' नेत्यांसोबत दिसले अन् आता राज ठाकरेंचा ऐन दिवाळीत ‘तातडीचा’ मेळावा; मोठा राजकीय ‘धमाका’ होणार?

काही लोकं, अधिकारी इथून गेलेले 30-30 वर्षे झाली तरी त्यांची नावे मतदारयादीत आहेत. हा आकडा जिल्ह्यात एक लाखांहून अधिक असेल. पण निवडणूक आयोग म्हणजे नावे काढू नका. अरे ही डबल नावे तुम्ही का काढत नाही? असा भारताचा कोणता कायदा आहे, कोणतं संविधान असं आहे की अशी बोगस नावे तुम्ही कायम ठेवत आहात? मृत्यू झालेल्यांची नावे तुम्ही काढत नाही, असा सवालही गायकवाड यांनी केला.

Eknath Shinde | Ajit Pawar | Devendra Fadnavis
Supreme Court : CJI गवईंनी ‘तो’ विषय संपवला, पण मोदी सरकार कारवाईवर ठाम; दिवाळीनंतर फैसला

आता जे वयात आलेत, जे मतदान करू शकतात, त्यांचा अधिकार तुम्ही हिसकावून घेत नाही का?, असा सवाल गायकवाड यांनी केला. हे सरकारच्या हातात नसते. निवडणूक आयोग त्यासाठी आहे. त्यांनीच हे ठरवलं पाहिजे. एकतर मृत्यूचा दाखला तुम्ही निवडणूक आयोगाशी जोडून घ्या, आधार कार्डशी जोडून घ्या. म्हणजे कुणाचा मृत्यू झाला हे कळेल. आधारशी लिंक केल्यामुळे डबल नावेही कळतील. पुन्हा डबल नावे येणार नाहीत, असा उपायही गायकवाड यांनी सुचवला आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com