Sanjay Raut : मुख्यमंत्रिपदाचा चेहरा स्पष्ट आणि साफ हवा; राऊतांनी भाजपला डिवचलं, 'लादलेल्या तीन चेहऱ्यांसह...'

Shiv Sena MP Sanjay Raut presented the role of Chief Minister : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीला समोरे जाताना 'मविआ'कडे साफ आणि स्पष्ट चेहरा हवा, असे सांगून महायुती तीन चेहरे घेऊन निवडणुकाला समोरे जाणार असल्याचे संजय राऊतांनी भाजपला डिवचलं.
Sanjay Raut 2
Sanjay Raut 2Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदावरून पुन्हा एकदा विधान केलं आहे. त्यावर संजय राऊत यांनी हरियाणातील निवडणूक पाहता, आता महाराष्ट्रात निडवणुकांना समोरे जाताना मुख्यमंत्रीपदाचा चेहराच हवा.

'महाराष्ट्रसारख्या राज्यांमध्ये लोकांना अगोदर चेहरा हवा असतो. लादलेले चेहरे नको. मुख्यमंत्रिपदाचे तीन चेहरे घेऊन निवडणुकीला समोरं जाणार असेल, तर भाजपनं तसं जाहीर करावं, असं म्हणत, महायुतीमधील मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून संजय राऊत यांनी भाजपला डिवचलं. संजय राऊतांनी माध्यमांसोमर मुख्यमंत्रिपदावरून मांडलेल्या भूमिकेवरून महाविकास आघाडीमध्ये चलबिचल झाली आहे.

महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेसमोर तडजोड नाही

हरियाणातील काँग्रेसच्या पराभवानंतर महाराष्ट्रात शिवसेनेची (Shiv Sena) जागा वाटपात शिरजोर राहिल, असे सांगितले जाते. यावर संजय राऊत म्हणाले, असे अजिबात होणार नाही. कोणती 'बार्गेनिंग पॉवर'? कोणतीही 'बार्गेनिंग पॉवर' वाढणार नाही. महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेसाठी कोणतीही 'बार्गेनिंग पॉवर'ची चर्चा महाविकास आघाडीत नाही. महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेसाठी कोणतीही तडजोड होणार नाही. हरियाणात काँग्रेसच्या चुका झाल्या आहेत. त्या महाराष्ट्रात होणार नाही, याची आता आम्ही पुरेपर काळजी घेऊ. महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेसमोर कोणतीही तडजोड नाही, असे संजय राऊत यांनी ठामपणे सांगितले.

Sanjay Raut 2
NCP Politics : अजितदादांचा मोठा नेता तुतारी हाती घेणार? सुप्रिया सुळेंच्या गाडीतून जाताना चेहरा लपवल्याचा VIDEO व्हायरल

राज्याला चेहरा हवा

मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा विधान केलं आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे यांची भूमिका योग्य आहे. जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीत ओमर अब्दुला हा चेहरा होता. लोकांनी ओमर अब्दुला यांना आणि इंडिया आघाडीला मतदान केले. हरियाणामध्ये, असा चेहरा होता की नाही हे मला माहीत नाही. परंतु महाराष्ट्रसारख्या राज्यांमध्ये लोकांना अगोदर चेहरा हवा असतो. अगोदर निवडणूक लढायच्या, जिंकायच्या हे धोरण लोकांच्या पचनी पडत नाही. या राज्याला चेहरा हवा. स्पष्ट चेहरा हवा, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली.

Sanjay Raut 2
Nitesh Rane : नीतेश राणेंची अटक वॉरंटविरोधात धावाधाव, खासदार राऊतांचा बदनामीचा खटला

शिंदे लादलेला चेहरा

'एकनाथ शिंदे हा चेहरा नव्हता. तो लादलेला चेहरा होता. या चेहऱ्यानं महाराष्ट्रातील निवडणुकांना समोर जावं. भाजपने तसं जाहीर करावं. भाजपने (BJP) जाहीर करावं, की आमचे तीन चेहरे आहेत. फडणवीस, शिंदे आणि अजित पवार, या तीन चेहऱ्यांना घेऊन त्यांनी निवडणूक लढवावी. काही हरकत नाही. त्यांनी चेहरा जाहीर करावा, मग त्यांना कळेल', असा टोला संजय राऊत यांनी लगावला. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावं, यासाठी नवसं केले गेले आहेत. तशी मुंबईत बॅनरबाजी सुरू आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले, 'भाजपला हा नवस मान्य आहे का? हे नवसाचं पोर आहे. नवस रेडे कापून करायचे. त्यांच्या वेगळ्याप्रकारच्या श्रद्धा आहेत. असे नवस त्यांनी करत रहावेत'.

उमेदवारांच्या घोषणेनं अजितदादांना अडचणीत?

प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष आहेत. दिल्लीतून त्यांनी अजितदादांच्या उमेदवाराची घोषणा केली आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या निवडणुकीचा निर्णय दिल्लीत झाला होता. त्याचपद्धतीने अजितदादांचा निवडणुकीचा घोषणा दिल्लीतून झाली आहे. प्रफुल्ल पटेल यांनी घोषणा केल्याने अजित पवारांना त्यांचा आदेश मानावा लागले. बारामतीतून लढाव लागले. प्रफुल्ल पटेलांना अजितदादांना अडचणीत आणलं आहे की, अजून काय केलं आहे, हे पाहाणं महत्त्वाचं आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com