Shiv Sena UBT Candidature : ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेचे उमेदवार जाहीर, पदवीधरमधून दोघांना संधी, छत्रपती संभाजीनगर अन्...

Dattatray Lahane Dilip Ghuge MLC Elections : ठाकरेंच्या शिवसेनेकडून आपले दोन उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. मात्र, एका ठिकाणी काँग्रेसने आधीच उमेदवार जाहीर केल्याने येथे महाविकास आघाडीत लढत होणार आहे.
Shiv Sena UBT Candidature MLC Elections
Shiv Sena UBT Candidature MLC Elections Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Shiv Sena UBT :शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपले विधान परिषद शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातून आपले उमेदवार जाहीर केले आहेत. उमेदवारी जाहीर केल्यामुळे काँग्रेस विरुद्ध ठाकरेंची शिवसेना हा सामना होणार असल्याचे निश्चित आहे. अमरावती पदवीधरमधून ठाकरेंच्या शिवसेनेकडून दत्तात्रय लहाने यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर, छत्रपती संभाजीनगर पदवीधरमधून दिलीप घुगेंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. घुगे हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

काँग्रेसने अमरावतीमध्ये आपल्या उमेदवार आधीच जाहीर केला आहे. त्यामुळे अमरावतीमध्ये महाविकास आघाडीत लढत होणार आहे. तसेच अमरावतीची जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे भाजपमधून बंडखोरी होणार असल्याची चर्चा आहे.

दत्तात्रय लहाने यांनी आधीच सांगितले होती की, पक्षाने त्यांनी खूपआधीच तयारी करण्यास सांगितले होते. त्यानुसार त्यांची अनेक ठिकाणी भेटीगाठी घेऊन तयारी सुरू केली होती. काँग्रेस जाहीर केलेल्या उमेदवाराकडे आता तेवढा वेळ नाही. कारण पाच जिल्ह्यांमध्ये ही निवडणूक लढली जाणार आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या पदवीधरच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून दावा सांगितला जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, या जागेबाबत महाविकास आघाडीत एकमत झाल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून आपण उमेदवारी अर्ज आज दाखल करणार असल्याचे दिलीप घुगे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com