Shivsena UBT Split : 5 खासदार फुटल्याची चर्चा, ठाकरेंच्या शिवसेनेकडून मोठा खुलासा, 'सकाळीच संजय देशमुख अन् दोघांसोबत...'

Uddhav Thackeray Shivsena Sanjay Raut : शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षातील पाच खासदार फुटणार असल्याची चर्चा होती. याबाबत संजय राऊत यांनी मोठा खुलासा केला आहे.
Shivsena News
Shivsena NewsSarkarnama
Published on
Updated on

Sanjay Raut News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फूट पडल्याची चर्चा आहे. पाच खासदार फुटून नवीन गट स्थापन करणार असल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे. सुत्रांच्या हवाल्याने वृत्त देताना नवीन गट स्थापन करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांना पत्र देण्यात आल्याचे म्हटले आहे. मात्र, आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून यावर अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार, प्रवक्ते संजय राऊत म्हणाले की, 'शिवसेनेचा एकच गट आहे तो माननीय अरविंद सावतं यांच्या नेतृ्त्वात काम करतोय. कळत, समजतंय या ज्या गोष्टी आहेत त्या मागील दोन वर्षांपासून मी ऐकतो आहे.'

'काल (रविवारी) बहुतेक सर्व खासदार माननीय उद्धवसाहेबांच्या संपर्कात होते. आज सकाळपासून काही खासदारांचं आमचं बोलणं झालं आहे. आज सकाळी स्वतः संजय देशमुख आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली. आणखी दोन खासदारांची देखील उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली.', असे सांगत नवीन गट स्थापन करण्याच्या चर्चांची हवा राऊत यांनी काढली.

Shivsena News
Aditya Thackeray: ठाकरेंच्या खासदाराच्या मनात नेमकं काय? ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरु असतानाच संजय जाधव यांचा आदित्य ठाकरेंना खास मेसेज

...मग आम्ही उत्तर देऊ

पत्रकारांनी संजय राऊत यांना विचारले की, लोकसभा अध्यक्षांना पत्र देण्यात आल्याचे समजते. त्यावर राऊत म्हणाले की, 'तुम्हाला वाटत असेल की कोणी पत्र द्यायला गेले आहेत. तर, पत्राचा मसुदा येऊद्या मग आम्ही उत्तर देऊ'

शिंदेंच्या आमदाराचा मोठा दावा

उद्धव ठाकरेंचे पाच खासदार फुटत असल्याच्या चर्चा सुरू असतानाचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने यांनी धक्कादायक दावा केला आहे. ते म्हणाले, ऑपरेशन टायगर सुरू आहे. उद्धव ठाकरेंचे सात खासदार आणि 16 आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत.

Shivsena News
उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढले; शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट, सात खासदार आणि 16 आमदार शिंदेंच्यासोबत...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com