Shivsena News : उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढले; शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट, सात खासदार आणि 16 आमदार शिंदेंच्यासोबत...

Operation Tiger News : दिल्लीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे वाशीम-यवतमाळचे खासदार संजय देशमुख यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे केंद्रीय मंत्री प्रताप जाधव यांची भेट घेतली.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai news : राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा जोरात सुरु आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित मातोश्रीवर झालेल्या बैठकीला 9 पैकी 4 खासदार प्रत्यक्ष हजर होते तर 5 खासदार ऑनलाइन मिटिंगमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे रविवारी दिवसभर या घडामोडीवर चर्चा झाल्या नव्हत्या. मात्र, सोमवारी दिल्लीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे वाशीम-यवतमाळचे खासदार संजय देशमुख यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे केंद्रीय मंत्री प्रताप जाधव यांची भेट घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरच्या चर्चेला उधाण आले आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने यांनी ऑपरेशन टायगर लवकरच पूर्ण होणार असल्याचे सांगत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

येत्या काळात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेत उभी फूट पडणार असल्याचे सांगत त्यांनी सात खासदार, १६ आमदार हे एकनाथ शिंदेच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ऑपरेशन टायगर लवकरच पूर्ण होणार असून त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठरविणार असल्याचे सांगत कृपाल तुमाने यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Uddhav Thackeray
Operation Tiger: ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असतानाच दिल्लीत मोठी घडामोड : ठाकरेंच्या बैठकीला ऑनलाईन उपस्थित राहिलेला खासदार केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीला

गेल्या आठ दिवसापासून ऑपरेशन टायगर सुरु होणार असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमामध्ये रंगल्या आहेत. त्यातूनच दोन्ही शिवसेनेतून (Shivsena) एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे १९ जून रोजी शिवसेनेचा स्थापना दिवस दोन्ही शिवसेनेकडून साजरा केला जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर वेगवान घडामोडी घडत असल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

Uddhav Thackeray
Operation Tiger : उद्धव ठाकरेंची खासदारांसोबतची हायव्होल्टेज बैठक संपली! उपस्थित असलेल्यांची यादीच आली समोर; 'त्या' पाच जणांशी फोनद्वारे चर्चा

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी रविवारी मातोश्रीवर बोलावलेल्या बैठकीला ऑनलाईन उपस्थित असलेल्या संजय देशमुखांनी मंत्री प्रतापराव जाधवांची भेट घेतल्याने काहीसा संभ्रम निर्माण झाला होता. हा संभ्रम दूर करण्यासाठी संजय देशमुखांनी उद्धव ठाकरेना संपर्क साधून आपली भेट महाविद्यालयाच्या परवानगीच्या कामानिमित्त होती, असे स्पष्टीकरण दिले आहे.

Uddhav Thackeray
Operation Tiger : ऑपरेशन टायगरला हवा; उद्धव ठाकरेंच्या बैठकीला 'या' तीन खासदारांची दांडी; कारणही आले समोर!

दुसरीककडे रविवारी मातोश्रीवर पार पडलेल्या बैठकीला संजय जाधव, संजय देशमुख, ओम राजेनिंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि नागेश पाटील आष्टीकरही गैरहजर होते. याविषयी जेव्हा संजय राऊतांना विचारणा झाली, तेव्हा त्यांनी पाच खासदार ऑनलाईन उपस्थित असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात मात्र केवळ नागेश आष्टीकरांशीच उद्धव ठाकरेंची ऑनलाईन चर्चा झाल्याचे समोर आले आहे. इतर खासदारांनी उद्धव ठाकरेंशी चर्चाच केली नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.

उद्धव ठाकरेंनी बोलावली आमदारांचीही बैठक

खासदारांची बैठक घेतल्यानंतर आता उद्धव ठाकरेंकडून आमदारांची बैठक बोलवण्यात आली आहे. 22 जून 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता शिवालय, मंत्रालयासमारे, मुंबई येथे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) विधीमंडळ पक्षाच्या विधानसभा व विधानपरिषदेच्या सर्व सन्माननीय सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत.

Uddhav Thackeray
INDIA alliance meeting : उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या बैठकीला दिल्लीला गेले नाहीत! एकनाथ शिंदेंनी उडवली खिल्ली; पडद्यामागचे 'ते' कारण केले उघड!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com