

Mumbai News : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बड्या महिला नेत्याला अटक करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. नवी मुंबईतील भंगार व्यवसाय करणाऱ्या एका व्यावसायिकाला 2 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी एकनाथ शिंदे यांच्या महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुखाला अटक करण्यात आली आहे. तर इतर चार साथीदार सध्या फरार असून, पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. एका सत्ताधारी पक्षाच्या महिला नेत्यालाच खंडणी प्रकरणात अटक झाल्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली आहे. या खंडणी प्रकरणात तक्रार देणाऱ्याचे नवी मुंबईतील इंदिरा नगर परिसरात भंगाराचे दुकान आहे. या परिसरात दुकान चालवायचे असेल, तर 2 लाख रुपयांची खंडणी द्यावी लागेल, अशी धमकी शिंदे यांच्या शिवसनेच्या उपजिल्हा संघटक पूजा बनसोडेने दिली होती. तक्रारदाराने ही खंडणी देण्यास नकार दिला होता.
खंडणीचे पैसे देण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या पूजा बनसोडेने तिचे सहकारी रमजान शेख, सरिता सरवदे, नरेंद्र साकवार आणि हुसेन शेख यांना सोबत घेऊन थेट तक्रारदाराच्या दुकानात धाड घातली. यावेळी या सर्वांनी मिळून व्यावसायिक आणि त्यांच्या दुकानात काम करणाऱ्या कामगाराला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली, त्यासोबतच अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.
या प्रकारानंतर पीडित व्यावसायिकाने थेट पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. याप्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि मुख्य आरोपी पूजा बनसोडेला बेड्या ठोकल्या आहेत. या गुन्ह्यातील पूजाचे इतर चार साथीदार सध्या फरार असून, पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. एका सत्ताधारी पक्षाच्या महिला नेत्यालाच खंडणी प्रकरणात अटक झाल्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.