Shivneri Sundari : आता 'ST'च्या 'शिवनेरी'त प्रवाशांना असणार "शिवनेरी सुंदरी"ची साथ!

Bharat Gogawale News : जाणून घ्या, कोणत्या मार्गावरील आणि कोणत्या एसटी बसमध्ये मिळणार ही सेवा? ; एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावलेंनी दिली आहे माहिती.
Bharat Gogawale
Bharat GogawaleSarkarnama
Published on
Updated on

Bharat Gogawale ST corporation Meeting : राज्य सरकारकडून एस.टी. महामंडळ अधिकाधिक फायद्यात राहण्यासाठी विविध उपाययोजना कायमच केल्या जातात. कधी बस प्रवासात सवलत, तर कधी विविध आकर्षक प्रवास पॅकेजची घोषणा केली जाते. यानंतर आता चक्क एसटी प्रवाशांसाठी विमानातील हवाई सुंदरी प्रमाणे एसटच्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांच्या मदतीसाठी 'शिवनेरी सुंदरी' असणार आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास आता अधिक सुकर होणार आहे.

एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले(Bharat Gogawale) यांनी महामंडळाच्या ३०४ व्या बैठकीमध्ये सांगितले की, मुंबई- पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा देणारी परिचारिका (शिवनेरी सुंदरी) नेमण्यात येणार असून, प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार न लावता प्रवाशांना चांगल्या सेवा सुविधा देऊन गुणात्मक सेवेचा दर्जा उंचावेल अशी अभिनव योजना भविष्यात सुरू करण्यात येणार आहे. या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर,‍ परिवहन आयुक्त विवेक भीमनवार व एसटी महामंडचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.

Bharat Gogawale
Pune Vidhansabha Election 2024 : पुण्यात चार मतदारसंघात उमेदवार फिक्स; कसबा अन् कॅन्टोन्मेंटमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच

एसटी महामंडळाचे नवे अध्यक्ष भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली ३०४ वी संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विविध खात्याच्या तब्बल ७० पेक्षा जास्त विषयांवर चर्चा होऊन त्यांना मान्यता देण्यात आली. त्यापैकी, मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी परिचारिका नेमण्यास मान्यता देण्यात आली.

याशिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या संकल्पनेतील स्वर्गीय आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ एसटीच्या ३४३ बस स्थानकांवर "आनंद आरोग्य केंद्र" या नावाने दवाखाना सुरू करण्यात येणार असून, अत्यंत माफक दरामध्ये बस स्थानकांवरील प्रवाशां बरोबरच आसपासच्या सर्व नागरिकांना कमी दरामध्ये विविध आरोग्य चाचण्या व औषधे एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी संबंधित संस्थांना बसस्थानकांवरील ४०० ते ५०० चौ.सेमी. ची जागा उपलब्ध करून देण्यात येईल. तेथे त्या संस्थेने आरोग्य तपासणी दवाखाना, पॅथॉलॉजी लॅब व औषध दुकान सुरू करून सेवा द्यावयची आहे.

Bharat Gogawale
Rohit Pawar Vs Devendra Fadnavis : 'दिल्लीवरून आदेश आला, म्हणून फडणवीस घाबरलेत'; रोहित पवारांचा हल्लाबोल

याचबरोबर एस. टी. महामंडळाच्या प्रत्येक बस स्थानकांवर त्या परिसरातील महिला बचत गटांना आपले स्थानिक पदार्थ विक्री करण्यासाठी चक्रीय पद्धतीने नाममात्र भाडे आकारुन १०X१० आकाराचा स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com