Priyanka Chaturvedi : प्रियांका चतुर्वेदींनी मारला पंजा पण घायाळ केले; शीतल म्हात्रे, ज्योती वाघमारेंनी

Shivsena Eknath Shinde: शिंदे गटाच्या महिला नेत्यांचा पारा चढला आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि ज्योती वाघमारेंनी हिशेब चुकता केला. 'दावोसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केले,' असा बोचणारा प्रश्न विचारून चतुर्वेदींना घायाळ करण्याचा प्रयत्न केला आहे.
Priyanka Chaturvedi
Priyanka ChaturvediSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Loksabha Election : मुंबईतील एकेका जागेसाठी प्रचंड ताकद लावलेल्या महायुती आणि महाविकास आघाडीतील राजकीय संघर्ष जहरी भाषेमुळे टोकदार होऊ लागला आहे. एरवी, विरोधकांनाही शांत, संयमाने बोलणाऱ्या शिवसेनेच्या (ठाकरे गट) खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी पहिल्यांदाच ठाकरेंच्या शिवसेनेच्या (Shivsena UBT) स्टाइलमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंवर शाब्दिक वार केले. 'मेरा बाप गद्दार है... हे खासदार शिंदेंच्या कपाळावर असेन, अशा धारदार शब्दांत चतुर्वेदींनी पंजाच मारला. ही भाषा ऐकताच शिंदे गटाच्या महिला नेत्यांचा पारा चढला आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि ज्योती वाघमारेंनी (jyoti Waghmare) हिशेब चुकता केला.

'दावोसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केले,' असा बोचणारा प्रश्न विचारून चर्तुवेदींना घायाळ करण्याचा प्रयत्न केला. त्यात वाघमारेंनीही चतुर्वेदींना झाप-झाप झापले. परिणामी, दोन्ही शिवसेनेतील वाघिणींनी भिडल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. चतुर्वेदींनी थेट श्रीकांत शिंदेंनाच लक्ष्य केल्याने संतापलेल्या म्हात्रे (Shital Mhatre), वाघमारेंनी आरोप-प्रत्यारोपाच्या या वादात युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरेंनाही ओढले आहे. त्यामुळे हा वाद नव्या वळणावर जाऊ शकतो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Priyanka Chaturvedi
Dindori Constituency : पवार घराण्यातील जावा तपानंतर भेटल्या, गळ्यात पडल्या अन् गहिवरल्या

लोकसभा निवडणुकीच्या Loksabha Election तीन टप्प्यातील मतदान आटोपताच मुंबईतील राजकीय माहोल तयार झाला आहे. विशेषत: निवडणुकीच्या रिंगणात नसतानाही आपापल्या पक्षांची बाजू मांडताना प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi), शीतल म्हात्रे आणि ज्योती वाघमारे याच एकमेकींशी झुंजत असल्याचेही पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, या तिघींनी एकमेकांची चांगलाच पाणउतारा केल्याने हा वाद पेटू शकतो आणि त्यात दोन्ही बाजूंकडून आखणी महिला नेत्याही येण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीतर्फे घाटकोपर येथे झालेल्या संजय दिना पाटील यांच्या निवडणूक प्रचार सभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी बोलतं होत्या. या सभेत बोलताना चतुर्वेदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत वादग्रस्त वक्तव्य केल आहे. चतुर्वेदींकडून केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या "गद्दार गद्दारही रहेगा... ?

एक चित्रपट आलेला, तुम्हालाही आठवत असेल दीवार. यात अमिताभ बच्चन त्यांचा हात दाखवतात, त्या हातावर लिहिलेलं असतं 'मेरा बाप चोर है'. श्रीकांत शिंदे यांच्या कपाळावर लिहिलंय, ‘मेरा बाप गद्दार हैं.’ 'असं प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या.

Priyanka Chaturvedi
Dhananjay Munde Speech : पोलिसांचा बाप काढणारा उद्या तुमचा बाप..; मंत्री धनंजय मुंडेचा लंकेंना टोला

काय म्हणाल्या शितल म्हात्रे

तुम्ही खासदार होण्यासाठी काय काय केले हे आम्हाला माहिती आहे आम्हाला बोलायला लावू नका, खासदारकीची टर्म संपल्यावरची चतुरताईंची तडफड आता दिसू लागलीय… दावोसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलत??? आणि मागच्या आठवड्यात परत खासदारही मिळवायला कुणा कुणाकडे लोटांगणं घातली ते सांगायला लावू नका... तुम्ही खासदार कशा झाल्यात हे सुद्धा आम्हाला माहीत आहे, असे म्हणत शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

ज्योती वाघमारेंना झाली बसंतीची आठवण

या वादात आता शिवसेनेच्या शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारेंनीही उडी घेतली आहे. प्रियंका चतुर्वेदींवर पलटवार करतांना ज्योती वाघमारे म्हणाल्या 'राज्यसभेच्या तिकीटासाठी लाचार काँग्रेससोडून कुणीतरी उबाठात आलय...!!! 'गोपी किशन' सिनेमा कदाचित प्रियंका ताईंनी पाहिला नाही वाटतं... त्यात एक डायलॉग आहे ...'मेरे दो - दो बाप' म्हटलं आज उबाठाच्या बसंतीला आठवण करुन देऊया... !!!''.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com