Deputy Sarpanch murder case : 4 वर्षांपासूनचा राग डोक्यात; जळगावात माजी उपसरंपचाच्या हत्येचे गूढ उलगडले...

Jalgaon deputy sarpanch Yuvraj koli Murder Case : कानस्वाडे (जळगाव) येथे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या नेत्याची शुक्रवारी हत्या झाली होती. अतिशय निर्घुणपणे झालेल्या या हप्त्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Murder Case
Murder Casesarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News : मस्साजोग (बीड) सरपंच संतोष देशमुख यांची हत्या चर्चेत असतानाच जळगाव जिल्हा माजी उपसरपंचाच्या हत्येने हादरला होता. युवराज कोळी (रा. कानसवाडे) असे त्यांचे नाव होते. शुक्रवारी (21 मार्च) सकाळी अतिशय निर्घृण पद्धतीने हा खून झाल्याचे समोर आले होते. तिघांनी धारदार शस्त्रांनी त्यांची हत्या केली होती. त्यानंतर आता या हत्येचे नेमके कारण समोर आले आहे. बिअर बारच्या वादातून ही हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे.

कानसवाडे गावात भरत भास्कर पाटील आणि मुलगा परेश यांचा धनाई परमिट रूम आणि बियर बार आहे. 2021 मध्ये कोळी उपसरपंच होते. कोरोनाच कालावधीत निर्बंध असतानाही पाटील बिअर बार उशिरापर्यंत सुरू ठेवत होते. नियमांचे पालन करत नव्हते. याबाबत कोळी यांनी उपसरपंच म्हणून त्यांना वारंवार समज दिली होती. त्यानंतर या वादातूनच कोळी आणि पाटील यांच्यात जोरदार भांडण देखील झाले होते.

Murder Case
Jalgaon Police: भले शाब्बास पोलिसांनो! ७ दिवस कपडेही बदलले नाहीत, मिळेल ते खाल्ले अन् सोनचोरांना पकडले!

यावेळी पाटील यांनी गावात गटारी आणि रस्ते केले जात नाहीत अशी तक्रार करीत वाद घातला. त्याच वेळेस त्यांनी तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली होती. हाच राग डोक्यात ठेवून युवराज कोळी आणि त्यांचे वडील शेतात काम करत असताना बियर बारचे मालक भरत भास्कर पाटील आणि त्यांचा मुलगा परेश यांसह भाऊ देवेंद्र उर्फ देवा पाटील यांनी त्यांना गाठले.

Murder Case
Jalgaon crime: धक्कादायक, पोलिस ठाण्यातूनचसुरू होती सोन्याची दामदुप्पट योजना, चक्क पोलिसांनाच गंडा!

यावेळी वाद करत त्यांनी धारदार शस्त्राने युवराज कोळी याच्यावर हल्ला चढवला. यात ते गंभीर जखमी झाले. यावेळी जवळच्या शेतात काम करणारे लोकही धावून आले. यावेळी पाटील हे पळून गेले. त्यांचा पाठलाग करण्यात आला. मात्र ते हाती लागले नाहीत. या प्रकारानंतर गावात मोठ्या संख्येने नागरिक जमले. परिसरात तणावाचे वातावरण होते.

Murder Case
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघाताला दोन व्यक्ती जबाबदार; अजितदादांनी सांगितला घटनाक्रम

संतप्त गर्दीने धनाई परमिट रूमची मोडतोड केली. तेथे असलेली पाटील यांची मोटरसायकल देखील जाळून टाकण्यात आली. पोलिसांनी फरारी झालेल्या आरोपींचा शोध अतिशय गांभीर्याने सुरू केला आहे. त्यासाठी दोन पथके रवाना झाली आहेत. त्यांच्या लपण्याचे ठिकाण पोलिसांना कळल्याचे बोलले जाते. लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com