Shivsena Foundation Day 2024 : ठाकरे की शिंदे, वर्धापन दिनाच्या सोहळ्यात कोण ठरलं वरचढ?

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : जमलेल्या मर्द, लढवय्या, शिवसैनिक बांधवांनो, भगिनी आणि मातांनो असे म्हणत उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणाची सुरुवात केली.
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray sarkarnama
Published on
Updated on

Shivsena : शिवसेना वर्धापन दिना निमित्त शिंदे गट आणि ठाकरे गटाचा जाहीर मेळावे मुंबईत पार पडले. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात एकमेकांवर जोरदार हल्ला चढवला. या दोघांपैकी कोणाचे भाषण जोरदार झाले, याची चर्चा रंगत आहेत.

जमलेल्या मर्द, लढवय्या, शिवसैनिक बांधवांनो, भगिनी आणि मातांनो असे म्हणत उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. तर, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय भवानी म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. मुख्यमंत्र्यांच्या संपूर्ण भाषणाचा रोख हा आम्हीच मूळ शिवसेना आहोत. तर, ठाकरेंनी शिंदेंसोबत भाजपची आपल्या भाषणात धुलाई केली.

दोघांनी ही व्यक्त केली खंत

ठाकरेंना आपल्या काही जागा गमवल्याचे जिव्हारी लागले असल्याचे सांगितले तर, एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे भाजपमुळे दोन ते तीन जागा गमावल्याचे म्हटले आहे. त्यामुळे दोघांनाही काही जागा गमल्याची खंत स्पष्टपणे त्यांच्या भाषणात दिसून आली.

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray
Eknath Shinde News : आदित्य ठाकरेंना वरळी नव्हे तर भेंडी बाजारसारख्या मतदारसंघातून लढावे लागणार; सीएम शिंदेंनी डिवचले

शिंदेंच्या निशाण्यावर ठाकरेच

एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी आपल्या संपूर्ण भाषणात उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला. आपलीच शिवसेना कशी खरी आहे तर, उद्धव ठाकरेंना मुस्लिम मतांमुळे ते विजयी होवू शकले. त्यांना बाळासाहेबांचा फोटो वापरण्याचा अधिकारी नाही, असा टोला लगावला.

ठाकरेंच्या निशाण्यावर शिंदेसोबत भाजपही

उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात एकनाथ शिंदे, भाजप BJP, नरेंद्र मोदी, राज ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केले. शिंदेंनी ठाकरेंवर जेवढा वेळ खर्ची घातला तेवढे महत्त्व ठाकरेंनी शिंदेंना दिले नाही. चौफेर टोलेबाजी करत ठाकरेंनी शिंदेसह नरेंद्र मोदी, राज ठाकरे यांच्यावर प्रहार केला.

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray
Ramdas Kadam News : 'फडणवीससाहेब, अजितदादा थोडे दिवस महायुतीत आले नसते तरी चालले असते...!'; कदमांचा घरचा आहेर

बाळासाहेबांचा फोटो कोणी वापरायचा?

भाजप, शिंदे गटाला माझे वडील बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरण्याचा अधिकार नाही. हिंमत असेल तर शिंदेंनी त्यांच्या बापाचा फोटो वापरून निवडणूक लढावी. तर, आपल्या भाषणाची सुरुवात तमाम हिंदु बांधवांनो न करणाऱ्या उद्धव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरण्याचा अधिकार नसल्याचा पलटवार एकनाथ शिंदेंनी केला.

भाजपला टोला

आपल्या भाषणात हो आम्हाला मुस्लिम मतं मिळाली, असे ठणाकवून उद्धव ठाकरेंनी सांगितले. तसेच आपल्याला संपवणाऱ्या हरामखोरांसोबत जायचं का? असा प्रश्न करून भाजला टोला लगावला. तर, एकनाथ शिंदेंनी काँग्रेसच्या मतांवर मुस्लिम मतांवर ठाकरे निवडून आल्याचा दावा केला. तसेच महायुतीची जबाबदारी आपली असल्याचे सांगितले.

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Challenge to Modi : उद्धव ठाकरेंचं मोदींना 'Open Challenge' ; म्हणाले 'विधानसभेच्या तयारीला आताच लागा, फक्त...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com