Mumbai News : लोकसभा निवडणुकीतील अपयशावरुन महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. निवडणुकीतील पराभवासाठी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटात हेवेदावे सुरू झाले आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच दुसरीकडे आता शिंदे गटाच्या नेत्यानं थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोरच अजित पवार गटाबद्दल थेट विधान केल्यानं महायुतीत नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.
शिवसेना पक्षाचा आज 58 वा वर्धापन दिन आहे.शिवसेनेतील फुटीनंतर दरवर्षी दोन वेगवेगळ्या ठिकाणी वर्धापनाचे कार्यक्रम केले जातात.यंदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मुंबईच्या षण्मुखानंद सभागृह येथे कार्यक्रम पार पडला. तर शिवसेना शिंदे गटाचा वरळी येथील डोम मैदानात कार्यक्रम झाला.
या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात दोन्ही गटाकडून एकमेकांवर टीकेची झोड उठवण्यात आली.याच कार्यक्रमात शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या एन्ट्रीवर थेट भाष्य केले.
रामदास कदम यांनी महायुतीलाच घरचा आहेर दिला आहे. कदम म्हणाले, "शिंदेसाहेब,मी हात जोडून तुम्हाला सांगतो त्या भाजपला सांगा,जसे भाजपने उमेदवार दोन महिने आधी दिले,तसे आमचे 15 उमेदवार पण दोन महिने आधी दिले असते तर आज चित्र वेगळे असते.मला 100 उमेदवार द्या, मी 90 उमेदवार जिंकून दाखवतो असा दावाही त्यांनी केला.
रामदास शिंदे यांनी "फडणवीससाहेब धन्यवाद,पण अजितदादा (Ajit Pawar) थोडे दिवस महायुतीत आले नसते तर चालले असते असं विधान केल्यामुळे आता आधीच लोकसभेतील निवडणुकीचं खापर एकमेकांवर फोडण्यावरुन बिनसलेल्या महायुतीसह पुन्हा वादाचा अंक रंगण्याची शक्यता आहे.
रामदास कदमांनी आपल्या भाषणात आदित्य ठाकरेंवरही निशाणा साधला. ते म्हणाले,आदित्यचे काय योगदान आहे, आमची मंत्रिपदे त्याला दिली. शिवसेनाप्रमुख असायचे तेव्हा मीटिंग व्हायची, नेत्यांना विश्वासात घेऊन पुढे जायचे. आता हा माणूस एकटंच सगळं बघतो. शिवसेना ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे असं त्यांना वाटतं. शिवसैनिक त्यांचे गुलाम असल्याचं त्यांना वाटतंय अशी टीकाही कदम यांनी उद्धव ठाकरेंवर केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.