Sanjay Gaikwad : शिवसेना आमदाराच्या अडचणीत मोठी भर, भाजप नेत्याकडूनच 100 कोटींच्या अब्रू नुकसानीचा दावा; कारवाईचीही मागणी

Sanjay Gaikwad Rs 100 Crore Defamation Notice Controversy : संजय गायकवाड यांनी गेल्या 06 एप्रिल आणि 10 एप्रिल रोजी पत्रकार परिषदेत बुलढाणा भाजपचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते.
Shivsena Politics eknath shinde
Shivsena Politics eknath shindesarkarnama
Published on
Updated on

Buldhana News : काही दिवसांपूर्वी दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता? पुस्तकाच्या प्रकाशकाला शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवीगाळ केली होती. यानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. तसेच त्यांच्याविरोधात आता तापास करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. तर पक्ष नेतृत्वानेही त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करत सूचना केल्या होत्या. यामुळे काहीशे बॅकफूटवर गेलेले संजय गायकवाड आता आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यांच्या विरोधात महायुतीमधील मित्रपक्ष असणाऱ्या भाजपनेच तक्रार केली असून कारवाईची मागणी केली आहे. तसेच तब्बल 100 कोटींच्या अब्रु नुकसानीचा दावा ठोकत नोटीस बजावली आहे. ही नोटीस बुलढाणा भाजपचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार विजयराज शिंदे यांनी बजावली आहे.

आपल्या वादग्रस्त वक्तव्य आणि कृत्यामुळे नेहमीच चर्चेत असलेल्या आमदार संजय गायकवाड आता चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांच्याविरोधात भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदे यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट कारवाईची मागणी केली आहे. याबाबत थेट वकील असीम सरोदे यांच्यामार्फत नोटीस बजावली आहे.

तर या नोटीनंतर गायकवाड यांच्यावर पॉक्सो, अॅट्रॉसिटी व मानवाधिकार उल्लंघन यांच्यासारखे गंभीर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी वकील असीम सरोदे यांनी केली आहे. यामुळे बुलढाण्यातील शिंदेंच्या शिवसेनेत खळबळ उडाली आहे.

Shivsena Politics eknath shinde
Sanjay Gaikwad Investigation : एकनाथ शिंदेंच्या आमदाराला न्यायालयाचा झटका; चौकशीला परवानगी, अडचण वाढणार?

तर ही नोटीस गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत भाजपचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यावर अनेक आरोप केले होते. ज्यानंतर स्थानिक राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. यावरूनच माजी आमदार शिंदे यांनी गायकवाड यांना 100 कोटी रुपयांच्या अब्रू नुकसानीची नोटीस बजावली आहे. तसेच गायकवाड यांनी पंधरा दिवसात माफी मागावी अन्यथा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करू असा इशारा दिला आहे.

यावेळी वकील असीम सरोदे यांनी बुलढाणा पोलीस अधीक्षकांना या नोटीसीबाबत माहिती देणारे पत्र लिहले असून ज्यात गायकवाड यांच्यांवर पोक्सो, ॲट्रॉसिटी आणि मानवाधिकार यांसारख्या कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे. या सर्व कायद्यांचं उल्लंघन गायकवाड यांनी केल्याचे सरोदे यांनी म्हटलं आहे.

Shivsena Politics eknath shinde
‘आता ही नाटक अन् तमाशा करायची गरज काय?’ गायकवाड पुन्हा तापले, Sanjay Gaikwad, Buldhana News Shivsena

दरम्यान आता नोटीसीमुळे, आमदार गायकवाड पुन्हा एकदा चर्चेत आले असून त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर आता या नोटीसला कसे उत्तर देतात की माफी मागतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com