Assembly Election 2024 : जागावाटपात शिंदे गटाकडून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न?

Maharashra Assembly Election 2024 : लोकसभेच्या चुका टाळत विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं महायुतीकडून सावध पावले टाकली जात आहेत. मात्र, जागावटपावरून शिंदे गट भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे.
eknath shinde | devendra fadnavis
eknath shinde | devendra fadnavissarkarnama
Published on
Updated on

लोकसभा निवडणुकीत महायुतीनं '45 पार'चे टार्गेट ठेवले होते. मात्र, महाविकास आघाडीची रणनीती, संविधान बदलाची चर्चा सर्वांत महत्त्वाचं म्हणजे जागावाटपाला उशिर झाल्यानं महायुतीला मोठा धक्के बसले. अवघ्या 17 जागांवर महायुतीला समाधान मानावे लागले होते. याचा शिवसेना शिंदे गटाला फटका बसला होता. पितृपक्षानंतर जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर होण्याची शक्यता आहे.

मात्र, लोकसभेसारखी चूक विधानसभेलाही होऊ नये, असं मत शिवसेना ( शिंदे गट ) आमदार संजय शिरसाट ( Sanjay Shirsat ) यांनी व्यक्त केलं. तसेच, जागावाटपात भाजपला तडजोड करावी लागणार म्हणत शिरसाटांनी कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. ते एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.

संजय शिरसाट म्हणाले, "लोकसभेला उशिरा जागावाटप झालं. तशी चूक विधानसभेला होऊ नये. उशिरा जागावाटप झाल्यानं उमेदवाराला वेळ मिळत नाही. त्यामुळे भाजपचे ( Bjp ) अध्यक्ष जे. पी नड्डा मुंबई दौऱ्यावर आले होते. नड्डा यांच्याकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी आहे. भाजप हा मोठा पक्ष आहे. त्यांच्याकडे आमदार जास्त असल्यानं जागावाटपात तडजोड करावी लागणार आहे."

eknath shinde | devendra fadnavis
MVA News : अखेर 'मविआ'चा फॉर्म्युला ठरला? काँग्रेसच मोठा भाऊ; कोणत्या पक्षाला किती जागा?

"जागावाटपाचा तिढा एका बैठकीत सुटणार नाही. तो सोडविण्याचा प्रयत्न जे. पी. नड्डा करत आहेत," असं शिरसाट यांनी म्हटलं.

संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडीचाही समाचार घेतला आहे. "जागावाटप ठरलं, मोठ्या ताकदीनं लढू, अशा वल्गना महाविकास आघाडीवाले कार्यकर्त्यांना धरून ठेवण्यासाठी करत आहेत. मात्र, महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरलेला नाही. काँग्रेसच्या एकाही नेत्यानं फॉर्म्युला ठरला आहे, असं सांगितलं का? हे फक्त ठाकरे गट बोलत आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) आणि शिवसेनेची ( ठाकरे गट ) युती कशी होईल, हे पाहणं देखील मजेशीर असणार आहे," असंही संजय शिरसाट म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com