Shivsena MLC Election: दोन उमेदवारांच्या 'दगाबाजी'चा धसका, उद्धव ठाकरेंनी 'प्लॅन'च बदलला; तिसऱ्या उमेदवाराबाबत घेतला मोठा निर्णय

Uddhav Thackeray Shivsena : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद निवडणुकीसाठी पक्षाच्या एकनिष्ठ उमेदवारांना संधी दिली होती. पण त्यात ऐनवेळी उमेदवारांनी पक्षनेतृत्वाच्या विश्वासाला तडा देत परस्पर निवडणुकीतून माघार घेतली. या माघारीचा धसका पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी घेतला आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या निवडणुकीतून अर्ज माघारी घेण्यासाठी गुरुवारी(ता.4 जून) ही अंतिम मुदत होती. मात्र,या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी पाहायला मिळाली. तसेच ऐनवेळी पक्षाच्या अधिकृत उमेदवारानेच माघार घेतल्यानं मोठी नामुष्की ओढावल्याचंही दिसून आलं. पण यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मोठा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे.

परंतू, अखेरच्या क्षणी महायुती बंडखोरी मोडून काढण्यात यशस्वी ठरली ,तर महाविकास आघाडी त्यातही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला प्रतिष्ठा पणाला लागलेल्या दोन जागांवर मोठा धक्का बसला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरेंनी तिसरा धक्का टाळण्यासाठी आपला प्लॅनच बदलल्याचं दिसून येत आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद निवडणुकीसाठी पक्षाच्या एकनिष्ठ उमेदवारांना संधी दिली होती. पण त्यात ऐनवेळी उमेदवारांनी पक्षनेतृत्वाच्या विश्वासाला तडा देत परस्पर निवडणुकीतून माघार घेतली.या माघारीचा धसका पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी घेतला आहे.

विधान परिषदेच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीकडून बाळ माने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.परंतु त्यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतली. त्याचदरम्यान, छत्रपती संभाजीनगर -जालना विधान परिषद मतदारसंघातही उमेदवार देवयानी डोणगावकर यांनी ऐनवेळी निवडणुकीतून अर्ज मागे घेत काढता पाय घेतला.

Uddhav Thackeray
Ahilyanagar MLC: अहिल्यानगरमधील 'हायव्होल्टेज ड्रामा'नंतर प्राजक्त तनपुरेंनी अखेर आमदारकीचा गुलाल उधळला; महायुतीच्या 17 पैकी 6 जागा बिनविरोध

या दोन ठिकाणचा माघारीचा फटका बसल्यानंतर उद्धव ठाकरेंनी जळगाव विधान परिषदेतील त्यांच्या शिवसेना पक्षाच्या उमेदवाराला थेट मुंबईतच बोलावून घेण्याच निर्णय घेतला आहे.या उमेदवाराने कोणत्याही राजकीय दबाव किंवा आमिषाला बळी पडून माघार घेऊ नये म्हणून जळगावमध्ये खबरदारी घेतली आहे.

जळगावमधील विधान परिषद निवडणुकीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार शरद तायडे यांना ठाकरेंनी संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्यामार्फत मुंबईत बोलावून घेण्यात आलं होतं. तायडे यांच्यासोबत ठाकरे गटाचे जळगावचे जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटीलही मुंबईत दाखल झाले होते.

Uddhav Thackeray
Anantrao Thopte Death: पुण्याच्या राजकारणातील बुलंद आवाज अन् काँग्रेस पक्षाचा झुंजार नेता हरपला; अनंतराव थोपटेंचं निधन

आता विधानपरिषद निवडणुकीतून अर्ज माघार घेण्याची मुदत संपली आहे. ही मुदत संपल्यानंतर जळगाव विधानपरिषदेचे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार शरद तायडे यांनी राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. याबाबतच्या माहितीला जळगावचे ठाकरे शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी दुजोरा दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com