Anantrao Thopte Death: पुण्याच्या राजकारणातील बुलंद आवाज अन् काँग्रेस पक्षाचा झुंजार नेता हरपला; अनंतराव थोपटेंचं निधन

Congress Leader News: काँग्रेसचा पुणे जिल्ह्यासह भोर मतदारसंघाच्या राजकारणावर दबदबा असलेलं आणि काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ कुटुंब म्हणून थोपटे घराण्याचा नावलौकिक होता. अनंतराव थोपटे हे काँग्रेसचा बुलंद आवाज होते.
Anantrao Thopte Death  (2).jpg
Anantrao Thopte Death (2).jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News: माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचं निधन झालं आहे. त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी गुरुवारी (ता.4 जून) सायंकाळी अखेरचा श्वास घेतला. भाजप नेते व काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांचे वडील होते.

अनंतराव नारायणराव थोपटे यांचं 93 व्या वर्षी पुण्यात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचा जन्म 11 जानेवारी 1933 रोजी झाला होता. अनंतराव थोपटे यांच्यावर गेल्या महिनाभरापासून रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, गेल्या दोन दिवसांत त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती.

काँग्रेसचा पुणे जिल्ह्यासह भोर मतदारसंघाच्या राजकारणावर दबदबा असलेलं आणि काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ कुटुंब म्हणून थोपटे घराण्याचा नावलौकिक होता. अनंतराव थोपटे हे काँग्रेसचा बुलंद आवाज होते. थोपटे यांचा पुण्यात काँग्रेस पक्षवाढीत मोठं योगदान राहिलं.त्यांच्या शब्दाला काँग्रेसमध्ये मोठा मान होता. म्हणूनच त्यांच्या निधनानंतर काँग्रेस पक्षात हळहळ व्यक्त केली जात आहे.

भोर विधानसभा मतदारसंघातून अनंतराव थोपटे हे तब्बल सहावेळा विधानसभेवर निवडून गेले होते. त्यांनी तब्बल 14 वर्षे राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केले होते. 1983 मध्ये वसंतदादा पाटील यांनी त्यांना पहिल्यांदा राज्यमंत्रिपद दिले होते. आमदारकीच्या दुसऱ्याच टर्ममध्ये त्यांना मंत्रिपद मिळाले होते.

Anantrao Thopte Death  (2).jpg
Mahayuti MLC Election : विधानपरिषद निवडणुतीत 4 बंडखोरांनी महायुतीला फेस आणला... शेवटपर्यंत मनधरणीनंतरही 4 मतदारसंघातील अर्ज कायम

अनंतराव थोपटे यांनी दुग्धविकास, पशुसंवर्धन, उच्च व तंत्रशिक्षण, परिवहन, पुनर्वसन, रोजगार हमी योजना, मत्स्यव्यवसाय, फलोत्पादन, संसदीय कार्य, विधिमंडळ कामकाज अशा अनेक खात्यांचा कारभार त्यांनी कार्यक्षमपणे केला. तसेच पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक म्हणूनही त्यांनी 1981-82 च्या दरम्यान काम पाहिले होते.

Anantrao Thopte Death  (2).jpg
Shivsena Crime News : उद्धव ठाकरेंच्या नेत्यावर पोलीस स्टेशन परिसरातच महिलांकडून हल्ला; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतील नाव

१९९९ च्या काळात अनंतराव थोपटे यांचे नाव महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत अग्रस्थानी होते. मात्र, याच १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत काशिनाथ खुटवड यांनी त्यांचा पराभव केला, ज्यामुळे त्यांची मुख्यमंत्रीपदाची संधी हुकली. पराभवानंतरही त्यांनी बांधलेली कार्यकर्त्यांची मजबूत फळी आजही पुणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात कार्यरत आहे.

अनंतराव थोपटे यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून 15 वर्षे काम पाहिले होते. तसेच त्यांनी 1990 या कालखंडात पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले होते. 1999 ते 2000 ते महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष(मंत्री दर्जा) होते. महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ(महानंदा डेरी) या संस्थेचे पहिले अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते.

अनंतराव थोपटे यांचे पुत्र संग्राम अनंतराव थोपटे हे त्याच भोर - राजगड - मुळशी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर सलग 3 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते सध्या भाजपमध्ये आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com