Ambadas Danve : 'लाडक्या भाऊ-बहिणीपेक्षा सुपाऱ्या प्रिय', राज ठाकरेंना अंबादास दानवेंनी डिवचले

Ambadas Danve On Raj Thackeray : लोकसभेत भाजपने मनसेचा वापर करून मराठी मते फोडण्याचे काम केले. विधानसभा निवडणुकीत देखील त्यांचा हाच उद्देश दिसतोय, असा टोला अंबादास दानवे यांनी राज ठाकरेंना लगावला.
Ambadas Danve | Raj Thackeray
Ambadas Danve | Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Ambadas Danve News : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असून 225 ते 250 असल्याचे जाहीर केले आहे. राज ठाकरे यांच्या या निर्णयाने मराठी मतांमध्ये फूट पडून उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांना फटका बसण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यात ठाकरे गटाचे नेते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला आहे.

'लोकसभेत भाजपने मनसेचा वापर करून मराठी मते फोडण्याचे काम केले. विधानसभा निवडणुकीत देखील त्यांचा हाच उद्देश दिसतोय. लाडक्या बहीण-भावापेक्षा लाडक्या सुपाऱ्या जास्त प्रिय दिसतात. त्यांनी एवढ्या वर्षात सुपाऱ्याच घेतल्या', असे म्हणत दानवेंनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.

कोण किती जागा लढणार यापेक्षा किती लोक निवडून येणार हे महत्वाचे आहे.मनसेने लोकसभेत बिनशर्त पाठिंबा दिला होता.मराठी मते फोडण्यासाठी मनसेचा वापर केला गेला. त्यामुळ मराठी मतात फूट पाडण्याचे पाप मनसेने केले, असे देखील दानवे म्हणाले.

मागच्या 25 वर्षात मुंबईत पाऊस पडला की शिवसेनेवर टीका होत होती. आता तिथे दोन वर्षे शिवसेनेची सत्ता नाही ना. पुण्यात तर भाजपची सत्ता होती. पुण्यात मुलं पोहत आहे. उपमुख्यमंत्री वाररूममध्ये जाऊन पाहतात. त्याने काय होतं.याला फक्त सत्ताधारी जबाबदार आहे, अशी टीका दानवे यांनी केली.

Ambadas Danve | Raj Thackeray
Ajit Pawar : शिखर बँकप्रकरणी अजितदादांच्या अडचणी वाढणार? न्यायालयात काय घडलं?

आत्ताचे अनाजी पंत फडणवीस

ठाकरेंमुळे भाजप महाराष्ट्रात उभी राहिली. भाजपला खेड्यापाड्यात कोणी विचारत नव्हते. ठाकरे पिता-पुत्रामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले.लोक अनाजीपंता बाबत बोलतात ते खोटं नाही. आत्ताचे अनाजी पंत फडणवीस आहेत, असे म्हणत दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.

Ambadas Danve | Raj Thackeray
Raju shetti : मका उत्पादक शेतकरी अडचणीत, राजू शेट्टी उतरले मैदानात!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com