

किशोरी पेडणेकर यांनी निवडणूक आयोगाच्या आगामी पत्रकार परिषदेसंदर्भात तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
मतदार याद्यांमध्ये घोळ घालून शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या मतदारांना लक्ष्य केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
‘लोकशाहीची नाही तर ठोकशाहीची निवडणूक आहे,’ असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.
Mumbai News : राज्यातील नगर पालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुका पार पडल्या असून फक्त निकाल येणं बाकी आहे. यानंतर आता राज्यातील रखडलेल्या 29 महापालिकांच्या निवडणुकांची कधी घोषणा होणार याकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. आता ही उत्सुकता संपुष्टात येणार असून राज्य निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याची शक्यता आहे. याबाबत आयोग पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्याची शक्यता आहे. यादरम्यान शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेवर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच गंभीर आरोप देखील केले आहेत. यावरून आता राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
आगामी राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांची तयारी पूर्ण राज्य निवडणूक आयोगाकडून झाली असून आता आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. याबाबत आयोगाने कालच सर्व महापालिका आयुक्तांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे लवकरच निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला जावू शकतो अशी शक्यता निर्माण झाली आहे. अशातच आज आयोगाकडून दुपारी चार वाजता मुंबईत पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. त्यामुळे आजपासून या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे.
यावरून किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी, मतदार याद्यांमध्ये घोळ घालूनच निवडणुका जाहीर केल्या जातील का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच ही लोकशाहीची निवडणूक नसून ठोकशाहीची असल्याचे म्हणत त्यांनी मतदार याद्यांमधील कथित गैरप्रकारांवरून तीव्र नाराजी व्यक्त केलीय.
त्याचबरोबर वॉर्ड मार्किंग करून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या मतदारांना लक्ष्य केले जात असल्याचा आणि त्यांची नावे यादीतून वगळली जात असल्याचाही गंभीर आरोप देखील पेडणेकर यांनी यावेळी केला आहे. यावेळी पेडणेकर यांनी केलेल्या आरोपावर भाजप नेते माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पलटवार केला आहे.
मुनगंटीवार यांनी, मतदार याद्यांमधील जो काही घोळ आहे. त्याविरोधात विरोधकांनी न्यायालयात जायला हवं होतं असा टोला लगावला आहे. यावर पेडणेकर यांनी देखील उत्तर दिले असून 'कोणी काहीही म्हणू देत, कारण त्यांना हेच हवे आहे, असेही पेडणेकर म्हणाल्या. तसेच त्यांनी आयोगाकडे आधी मतदार याद्यांमधील घोळ मिठवावा आणि त्यानंतर याद्या जाहीर केल्यानंतरच निवडणुका घ्याव्यात असे म्हटले आहे.
या आरोप-प्रत्यारोपानंतर भाजप नेते प्रविण दरेकर यांनी देखील पेडणेकर यांच्यावर पलटवार केला आहे. त्यांनी निवडणूक जाहीर होताच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची रडारड सुरू होते. याचे प्रत्यक्ष आताही आलं असून पेडणेकर यांच्या आगपाखडीतून बाहेर येत आहे. आयोग स्वायत असून सक्षम आहे. आम्ही त्यांना निवडणूका घोषित करा असेही सांगितलेलं नाही. तर संविधानानं निर्माण केलेल्या व्यवस्थेचं आपण सन्मान राखला पाहिजे.
मात्र शिवसेनेचं जनतेच्या दरबारात कोणतेच स्थान उरलेलं नाही, हे देखील जनतेनं ठरवलेलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावरून पेडणेकर यांनी अक्षेप घेत हे देखील आता भाजप ठरवणार का? असा सवाल केल्यानंतर निवडणुक झाल्यावर ते समोर येईल असेही दरेकर यांनी म्हटलं आहे. तर शिव्या देवून टोमणे आणि भावनिक बोलून जनता साथ देत नाही. तर विकासावर देते, असाही पलटवार दरेकर यांनी केलाय.
1. किशोरी पेडणेकर यांनी निवडणूक आयोगावर काय आरोप केले आहेत?
➡️ मतदार याद्यांमध्ये घोळ घालून ठराविक पक्षाच्या मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
2. वॉर्ड मार्किंगचा आरोप नेमका काय आहे?
➡️ विशिष्ट वॉर्डमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या मतदारांना लक्ष्य करून त्यांची नावे यादीतून हटवली जात असल्याचा दावा आहे.
3. ‘ठोकशाही’ हा शब्द पेडणेकरांनी का वापरला?
➡️ निवडणूक प्रक्रिया पारदर्शक नसल्याचा आरोप करत त्यांनी लोकशाही धोक्यात असल्याचे म्हटले.
4. सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली?
➡️ ‘विरोधकांनी न्यायालयात जावे’ या वक्तव्याला उत्तर देताना, ‘त्यांना हेच हवे आहे’ असे त्या म्हणाल्या.
5. या आरोपांचा पुढील राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
➡️ निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासाचा प्रश्न निर्माण होऊन राजकीय वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.