Rohini Khadse : गुलाबराव पाटलांवर रोहिणी खडसे भडकल्या; म्हणाल्या, 'तुमचं सरकार निर्लज्ज प्रवृत्तीचं'

Rohini Khadse on Gulabrao Patil : राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील कोणत्या ना कोणत्या वक्तव्यामुळे अडचणीत येत असतात. आताही त्यांनी महिलांनी सुरक्षिततेसाठी स्वतःच्या पर्समध्ये मिरचीची पूड आणि चाकू ठेवावा असे वक्तव्य करून टीकेचे धनी बनले आहेत.
Rohini Khadse
Rohini KhadseSarkarnama
Published on
Updated on

Pune News : राज्यातील पुणे आणि बीडमधील महिला अत्याचारांच्या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच राज्याचे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी महिला सुरक्षेचा विषय राज्य सरकारच्या अखत्यारीतला नसून महिलांनी त्यांची सुरक्षा स्वत:च करावी, अशा प्रकारेचे वक्तव्य केल्याने वादाची ठिणगी पडली आहे. गुलावराब पाटील यांनी, महिलांनी पर्समध्ये लिपस्टिकसह मिरचीची पूड आणि रामपुरी चाकू ठेवावा, असे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सांगत असत. त्यामुळे टीका व्हायच्या. पण आता घडणाऱ्या घटना पाहिल्या तर महिलांनी आत्मसंरक्षणासाठी मिरचीची पूड आणि रामपुरी चाकू स्वत: ठेवण्याची वेळ आल्याचे वक्तव्य केलं होतं. यामुळे आता नवा वाद उफाळला आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तव्याचा आधार घेत शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी महिलांनी स्वत:चे संरक्षण करावे असे म्हटले होते. तसेच सध्याच्या घडीला महिलांनी आत्मसंरक्षणासाठी सज्ज राहिलं पाहिजे, असेही त्यांनी जळगावात आयोजित महिला दिनानिमित्ताच्या कार्यक्रमात म्हटले होते. यावरून आता नवा वाद सुरू झाला असून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

रोहिणी खडसे यांनी, गुलाबराव पाटील म्हणतात पर्समध्ये मिरचीची पूड आणि चाकू ठेवा, आत्मसंरक्षणासाठी सज्ज व्हा. पण महिलांच्या सन्मानाबाबत आपण बोलूच नये. कारण याआधी आपण महिलांचा कसा सन्मान करता हे दाखवून दिले आहे. आपल्या मतदारसंघातील रस्त्यांची तुलना आपण मालिनी यांच्या गालांशी केली होती. यामुळे महिलांचा सन्मानाबाबत आपल्याला किती काळजी आहे ते आम्ही आधीच बघितले आहे असा टोला लगावला आहे.

Rohini Khadse
Rohini Khadse News : ‘आम्हाला एक खून करण्याची परवानगी द्या’, खडसेंची अजब मागणी

तसेच रोहिणी खडसे गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याचा निषेध करताना, तुमच्या प्रवृत्तीचाही निषेध करत असल्याची टीका केली आहे. गुलाबराव म्हणातात ते आता महिलांनी सुरक्षिततेसाठी त्यांना हवे ते त्यांनी करावं. यात सरकारची कोणतीही भूमीका नसेल. सरकार म्हणून महिलांच्या संरक्षणासाठी काहीही करणार नाही, असाच त्यांच्या सांगण्याचा अर्थ आहे. यामुळे हे महायुतीचे सरकार महिलांना सुरक्षित वातावरण देण्याचे अपयशी ठरले आहे. जे गुलाबराव पाटलांनी मान्य केलं आहे, असा दावाही रोहिणी खडसे यांनी केला आहे.

Rohini Khadse
Rohini Khadse : '..तर महाराष्ट्रातील सामान्य महिलांना न्याय कसा मिळणार?', खडसेंचा सवाल

तर एकीकडे आम्ही महिलांना सुरक्षित वातावरण मिळावं म्हणून संघर्ष करत असताना गुलाबराव पाटील आपले अंग काढून घेत आहेत. लढण्याऐवजी महिलांनो आत्मसंरक्षणासाठी सज्ज व्हा म्हणत तुमचं काय ते बघा असे वागत आहेत. यामुळे तुमच्या अशा प्रवृत्तीचा आम्ही निषेध करत असून तुमच्या निर्लज्ज सरकारचा देखील आम्ही निषेध करतोय असा हल्लाबोल रोहिणी खडसे यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com