Maharashtra News: विकासाच्या गप्पाच...! शेतकरी आत्महत्येनंतर फडणवीस सरकारची चिंता वाढवणारी आणखी एक धक्कादायक बाब समोर

Malnourished Children : गेल्या अनेक वर्षांपासून संपूर्ण देशासह महाराष्ट्रातही बालकांच्या कुपोषणाच्या गंभीर समस्या डोके वर काढत आहे.
Mahayuti government
Mahayuti government Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : 'निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान...';अशी टॅगलाईन घेऊन महायुती सरकार सत्तेत आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती (Mahayuti) सरकारनं एकापाठोपाठ एक धडाकेबाज निर्णय घेत स्वत:ची पाठ थोपटून घेत असल्याचं अनेकदा दिसून आलेलं आहे. पण दुसरीकडे शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्येनंतर आता सरकारची चिंता वाढवणारी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्रातील कुपोषित बालकांसंबंधीचे सर्वेक्षण करण्यात आलं. यात दुर्गम भागच नव्हे तर मोठमोठ्या महानगरांतही कुपोषित बालकांचं प्रमाण चांगलंच वाढताना दिसून येत आहे. यापूर्वी मेळघाटासह काही नाशिक जिल्ह्यातील काही आदिवासी भागात कुपोषित बालकं आढळून येत होती. मात्र,आता मुंबई, पुण्यासह विविध शहरांतही कुपोषितांची समोर आलेली आकडेवारी निश्चितच चिंताजनक आहे.

राज्य सरकारकडून महाराष्ट्रात केलेल्या सर्वेक्षणात तब्बल 1 लाख 82 हजार 443 बालकं कुपोषित असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सर्वाधिक कुपोषित (Malnourished) बालके मुंबई उपनगरांत असल्याचम धक्कादायक वास्तव देखील या आकडेवारीतून समोर आलं आहे.

महाराष्ट्रात (Maharashtra) सध्या 1 लाख 51 हजार 643 ही मध्यम तर तीव्र कुपोषित बालकांची संख्या 30,800 असल्याचं सर्वेक्षणात समोर आलं आहे .मुंबई, पुण्यातही कुपोषित बालकांची वाढती आकडेवारी सरकारसह प्रशासनाची काळजी वाढवणारी आहे. यातही ग्रामीणपेक्षा शहर परिसरात कुपोषित बालकांचं प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे.

Mahayuti government
Gokul Milk : सततच्या राजकारणाने 'गोकुळ'च्या संचालकांना 'मानसिक थकवा'; रिफ्रेशमेंटसाठी गेले गोव्याला!

गेल्या अनेक वर्षांपासून संपूर्ण देशासह महाराष्ट्रातही बालकांच्या कुपोषणाच्या गंभीर समस्या डोके वर काढत आहे. एकीकडे भारत तिसरी आर्थिक महासत्ता होण्याकडे वाटचाल सुरू आहे. अशातच देशाची भावी पिढी सशक्त, सुदृढ असणं महत्त्वाचं आहे.

त्यासाठी लहान वयातच मुलांना चांगला आहार मिळणं आवश्यक आहे.मात्र, गरीबीमुळे लाखो मुलांना आणि मातेलाही पोषक आहार मिळत नसल्यानं जन्मतः कुपोषणाची शिकार ठरणाऱ्या बालकांचं प्रमाण मोठं आहे.

केंद्र सरकारकडून बालकांच्या कुपोषणाबाबत आणि त्यांच्या मातांना सकस आहार मिळावा यासाठी अनेक योजना सुरू आहेत. पण या योजनांच्या लाभापासून ग्रामीणसह शहरीभागातही वंचित राहत असल्याची धक्कादायक आकडेवारी सर्वेक्षणातून समोर आली आहे

Mahayuti government
Padalkar Brother Land Scam : गोपीचंद पडळकरांच्या भावाने हडपली 17 एकर जमीन? 82 वर्षाची आजी विधानभवनावर धडकल्या

महाराष्ट्रातील प्रमुख जिल्हे आणि कुपोषित बालकांची संख्या

मुंबई उपनगर -

कुपोषित-16, 344

मध्यम -13, 457

तीव्र - 2887

नाशिक

कुपोषित -9, 852

मध्यम - 8,944

तीव्र-1,852

Mahayuti government
Ambadas Danve On ZP School : हिंदी लादू पाहणाऱ्यांच्या काळात मराठी भाषा टाचा घासतेय! शाळांच्या दुरावस्थेकडे अंबादास दानवेंनी लक्ष वेधले ..

ठाणे -

कुपोषित- 8,210

मध्यम -7,366

तीव्र- 844

पुणे-

कुपोषित -7,576

मध्यम - 7,410

तीव्र - 1,666

धुळे -

कुपोषित - 8,118

मध्यम - 6,377

तीव्र - 1,741

छत्रपती संभाजीनगर

कुपोषित-7,926

मध्यम 6,487

तीव्र- 1,439

Mahayuti government
Kunal Patil Politics; कुणाल पाटील म्हणतात, वडील रोहिदास पाटील यांनीही भाजप प्रवेशाला विरोध केला नसता!

नागपूर

कुपोषित-8,088

मध्यम 6,715

तीव्र- 1,373

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com