Shrikant Shinde News : दिल्लीत श्रीकांत शिंदेंना मिळणार 'ही' मानाची खुर्ची

Lok Sabha Result News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी शिवसेना शिंदे गटाच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक पार पडली. खासदारकीची हॅट्ट्रिक करणाऱ्या श्रीकांत शिंदें यांच्या नावावर चर्चा करण्यात आली असल्याचे समजते.
Shrikant shinde
Shrikant shindesarkarnama

Shivsena Politcs News : लोकसभा निवडणूक निकालानंतर सर्वच पक्षात वेगाने घडामोडी घडत आहेत. गुरुवारी दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी शिवसेना शिंदे गटाच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक पार पडली.

यावेळी नव्याने निवडून आलेल्या खासदारांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यासोबतच यावेळेस शिवसेना (Shivsena) शिंदे गटाच्या लोकसभा गटनेते पदासाठी खासदारकीची हॅट्ट्रिक करणाऱ्या श्रीकांत शिंदें यांच्या नावावर चर्चा करण्यात आली असल्याचे समजते. या बैठकीस शिवसेना शिंदे गटाचे सर्व सात खासदार उपस्थित होते. (Shrikant Shinde News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित पार पडलेल्या बैठकीत विविध महत्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या लोकसभा गटनेते पदासाठी श्रीकांत शिंदें यांच्या नावावर चर्चा करण्यात आली. यावेळी सर्वच खासदारांचे त्यांच्या नावावर एकमत झाले असल्याचे समजते.

दरम्यान, श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याचे समजते. गुरुवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबतच शिंदे गटाचे खासदार दिल्लीला रवाना होणार आहेत. दिल्लीमध्ये महत्वपूर्ण बैठक होणार असल्याचे समजते. या बैठकीस ते उपस्थित राहणार आहेत.

Shrikant shinde
Pandharpur Assembly : माजी मंत्र्यांसह आजी-माजी आमदारांना धोबीपछाड देत पंढरपूर-मंगळवेढ्यात प्रणिती शिंदेंची मुसंडी

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com