SIR deadline extended : मतदारांसाठी खूशखबर! SIR अर्जासाठी पुन्हा मिळाली मुदतवाढ; 'या' तारखेपर्यंत भरता येणार फॉर्म?

SIR deadline extended latest news: SIR अर्ज भरण्याची मुदत पुन्हा वाढवण्यात आली आहे. नवीन अंतिम तारीख, अर्ज प्रक्रिया, पात्रता आणि महत्त्वाच्या सूचना येथे जाणून घ्या.
SIR Form Deadline Extended: Check the New Last Date
SIR Form Deadline Extended: Check the New Last DateAI generated Image
Published on
Updated on

New deadline for SIR application: राज्यासह देशभरात सुरू असलेल्या Special Intensive Revision (SIR) अर्थात विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

SIR फॉर्म भरण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आल्याने अद्याप अर्ज न भरलेल्या लाखो मतदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी ही प्रक्रिया 8 ऑगस्ट 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र अनेक मतदारांचे फॉर्म भरायचे बाकी असल्याने भारत निवडणूक आयोगाने सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.

भारत निवडणूक आयोगाने 1ऑक्टोबर 2026 हा अर्हता दिनांक निश्चित ठेवत महाराष्ट्रातील विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमात बदल केले आहेत. या निर्णयामुळे मतदारांना आवश्यक कागदपत्रांसह फॉर्म भरण्यासाठी अधिक वेळ उपलब्ध झाला आहे.

SIR Form Deadline Extended: Check the New Last Date
Samagra Shiksha: समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! 10 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या 3 हजार 276 जणांना सरकारकडून मोठं गिफ्ट

सुधारित वेळापत्रकानुसार बूथ लेव्हल अधिकारी (BLO) 30 जून ते 17 ऑगस्ट 2026 या कालावधीत घराघर जाऊन मतदारांची पडताळणी आणि फॉर्म संकलनाची प्रक्रिया पूर्ण करतील. त्याचबरोबर मतदान केंद्रांचे तर्कसंगतीकरण आणि पुनर्रचना 17 ऑगस्ट 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

यानंतर 24 ऑगस्ट 2026 रोजी मतदार यादीचा प्रारूप मसुदा प्रसिद्ध केला जाईल. या मसुद्यावर नागरिकांना 24 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर 2026 या कालावधीत दावे आणि हरकती दाखल करण्याची संधी दिली जाणार आहे. प्राप्त अर्जांवर सुनावणी घेऊन त्यांची पूर्ण प्रक्रिया 24 ऑगस्ट ते 22 ऑक्टोबर 2026 या कालावधीत केला जाईल.

सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम मतदार यादी 27 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती भारत निवडणूक आयोगाने दिली आहे. त्यामुळे अद्याप SIR फॉर्म न भरलेल्या मतदारांना आवश्यक कागदपत्रांसह अर्ज पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळाला आहे.

SIR Form Deadline Extended: Check the New Last Date
Beed Politics : बीडमध्ये सत्ता बदलाचे वारे : 'क्षीरसागरांच्या' हालचालींवर पंडित 'सायलेंट'; चव्हाणांची डॅमेज कंट्रोलसाठी धडपड

SIR प्रक्रियेला मुदतवाढ मिळाल्याने मतदारांमधील संभ्रम काही प्रमाणात दूर झाला असून, ज्यांचे फॉर्म अद्याप भरायचे बाकी आहेत त्यांनी सुधारित वेळापत्रकानुसार Online किंवा Offline पद्धतीने अर्ज पूर्ण करून मतदार यादीत आपले नाव कायम राहील याची खात्री करून घ्यावी.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com