Shinde Fadnavis Government : आर्वीच्या आमदारांनी स्वपक्षाविरोधातच थोपटले दंड; राजीनामा देण्याचा इशारा !

Dadarao Keche letter to Devendra Fadnavis : ''...हा माझा घोर अपमान आहे!''
Shinde Fadnavis Government
Shinde Fadnavis GovernmentSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : मागील वर्षी शिवसेनेत बंडखोरी उफाळून आली होती. यावेळी ४० आमदारांनी ठाकरेंना सोडचिठ्ठी दिली होती. बंडापाठीमागं शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांकडून महाविकास आघाडी सरकारमध्ये निधी मिळत नसल्याचा आरोप केला होता. यानंतर या नाराज आमदारांनी भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली. पण या निधी वाटपावरुन शिंदे फडणवीस सरकारमध्येही वादाची ठिणगी पडली असल्याचं समोर आलं आहे.

भाजप आमदार दादाराव केचे( Dadarao Keche)यांनी आमदाराने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून निधी वाटपाच्या मुद्द्यावरून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.यामुळे भाजपसह राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आणि महत्वाची बाब म्हणजे केचे यांनी थेट आमदारकीचा राजीनामा देण्याचा इशाराही दिला आहे.

Shinde Fadnavis Government
Lure of Ministership: मोठी बातमी : मंत्रिपद हवयं ; पावणेदोन कोटी द्या; BJP च्या सहा आमदारांची फसवणूक..

भाजप(BJP) आमदार दादाराव केचे यांच्या आर्वी विधानसभा मतदारसंघात राज्य सरकारकडून निधी देण्यात आला आहे. पण या निधीसाठी केचे यांनी कोणतंही पत्र दिलं नव्हतं. दुसऱ्यांच्याच पत्रावर हा निधी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याचवरुन संताप व्यक्त करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांना पत्र लिहिलं आहे. दुसऱ्याच्या पत्रावर मतदारसंघात निधी देणं हा आपला घोर अपमान असल्याचं या पत्रात केचे यांनी म्हटलं आहे. तसेच असंच जर होत असेल तर नाईलाजास्तव मला आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल असा कडक इशाराही त्यांनी दिला आहे.

भाजप आमदाराचं नेमकं म्हणणं काय?

निधी वाटपाच्या मुद्द्यांवर भाष्य करताना आमदार केचे म्हणाले, माझं पत्र नसताना 12 एप्रिल 2023 ला निधी देण्यात आला. आर्वीचा मी दुसऱ्यांदा आमदार आहे. माझ्या पत्राशिवाय विकासनिधी देऊ नये असं माझं मत आहे. तरीही निधी दिला. हा माझा घोर अपमान आहे. आणि असं जर होत असेल तर मला राजीनामा देण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याची रोखठोक भूमिका दादाराव केचे यांनी मांडली आहे.

Shinde Fadnavis Government
Rohit Pawar Statement: ''...तर जामखेड बाजार समितीत आमचा सभापती झाला असता!''; रोहित पवारांचं मोठं विधान

...हा आमदार म्हणून माझा घोर अपमान!

माझ्या मतदारसंघावर अनेकांचा डोळा आहे. म्हणून या मतदारसंघावर आघात केला जात आहे. मला जाणीव नसताना निधी दिला. हा आमदार म्हणून माझा घोर अपमान आहे. आष्टी आणि आर्वीला आधी निधी द्या. मग इतर निधी द्या. माझं पत्र असल्याशिवाय माझ्या मतदारसंघात निधी देऊ नका. आता जो दुसऱ्यांच्या पत्रावर निधी दिला तो निर्णय रद्द करा, अशी मागणी केल्याचंही त्यांनी सांगितलं.तसेच तिकीटाची चिंता नसून मतदारसंघात एकही कार्यकर्ता नसताना संघटना बांधल्याचंही केचे यावेळी म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com