Maharashtra Politics : शिंदे-फडणवीस सरकारचा ऑगस्ट 2022मध्ये पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. यात भाजप (BJP) आणि शिंदे गटाच्या प्रत्येकी 9 -9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.त्यानंतर दुसरा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. अशा वातावरणात आता मंत्रिपदासाठी घोडेबाजार होत आहे का, अशी शंका निर्माण झाली आहे. (maharashtra politics demanding money from bjp mlas over ministership)
मंत्रिपद मिळवून देतो असे सांगून कोट्यवधी रुपयांची मागणी केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा स्विय सहाय्यक असल्याचे सांगत या व्यक्तीने ६ आमदारांची फसवणूक केली आहे.
यातील दोन- तीन आमदारांनी या व्यक्तीला लाखो रुपये दिल्याचे समजते. पण पोलिसांनी याला अद्याप दुजोरा दिलेला नाही. नागपूर पोलिसांनी त्याला गुजरातमधील मोरबीमधून मंगळवारी (ता.१६ ) रात्री उशिरा ताब्यात घेतलं आहे. नीरज सिंह राठोड असं त्याच नाव आहे.
गेल्या काही दिवसापासून नीरज सिंह राठोड हा फोनवरुन या आमदारांच्या संपर्कात होता. जे.पी नड्डा यांचा निकटवर्तीय असल्याचा दावा त्याने केला होता. मंत्रिमंडळात महत्त्वाच्या विभागाची जबाबदारी मिळवून देतो, असे त्याने सांगितले होते. पक्षनिधी म्हणून पावणेदोन कोटी रुपये द्या. असे या आमदारांना सांगण्यात आले.
नागपुरातील भाजपचे आमदार विकास कुंभारे, टेकचंद सावरकर यांना काही दिवसांपूर्वी फोन आला होता. ज्यामध्ये निरज सिंह राठोड नामक व्यक्तीने भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगत मोठ्या रक्कमेची मागणी केली होती.
विकास कुंभारे यांनी याबाबत माहिती गोळा केली आणि नीरज सिंह राठोड नावाची कुठलीही व्यक्ती जे.पी. नड्डा यांच्या जवळची नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या स्वीय सहायकाच्या माध्यमातून नागपूर पोलिसांकडे लेखी तक्रार केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.