Sonu Sood : "सोनू सूद म्हणतो , 'मला इंटरेस्ट नव्हता म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची ऑफर नाकारली'"  

Sonu Sood political offer : राजकीय क्षेत्रातील अनेक ऑफर्स आल्याची माहिती खुद्द सोनू सूदने एका मुलाखतीत दिली आहे. अनेक हाय प्रोफाईल ऑफर मिळाल्यानंतर त्यांने राजकारणात जाण्याची आवड नसल्याचे स्पष्ट केले आहे
Sonu Sood
Sonu SoodSonu Sood sarkarnama
Published on
Updated on

Pune News : कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर 2020 मध्ये देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी स्थलांतरित मजुरांच्या मदतीला अभिनेता सोनू सूद देवासारखा धावून गेला होता.  एवढेच नाही तर लॉकडाऊन आणि कोरोना महामारीनंतरही त्याने आपले सामाजिक कार्य सुरु ठेवले. गरजूंना निस्वार्थपणे मदत करण्याचा सोनू सूदचा स्वभाव पाहून अनेकांनी त्याला राजकारणात जाण्याचा सल्ला दिला होता. 

त्याला राजकीय क्षेत्रातील अनेक ऑफर्स आल्याची माहिती खुद्द सोनू सूदने एका मुलाखतीत दिली आहे. अनेक हाय प्रोफाईल ऑफर मिळाल्यानंतरच त्यांने राजकारणात जाण्याची आवड नसल्याचे स्पष्ट केले आहे.

एका चॅनला दिलेल्या मुलाखतीत सोनू म्हणाला, “मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर आली होती. जेव्हा मी ती ऑफर नाकारली तेव्हा मला त्यांनी उपमुख्यमंत्री होण्याची ऑफर दिली. तसेच देशातील काही प्रतिष्ठित लोकांनी मला राज्यसभेवर पाठवण्याची तयारी दर्शवली होती. तुला राजकरणात कशासाठीही संघर्ष करावा लागणार नाही. राज्यसभेची जागा घे आपण सोबत एकत्र काम करू असं राजकारणातील मातब्बर लोकांनी सांगितले होते. हे आयकून आनंद झाला होता असं सोनू सूद म्हणाला.

Sonu Sood
BJP Congress Alliance : सत्तेसाठी कायपण! भाजप आणि काँग्रेस आघाडीचा 'या' राज्यात सुरू होता प्रयत्न, पण...

या ऑफर्सचा विचार करून सोनू सूद म्हणाला, 'जेव्हा तुम्ही लोकप्रियता मिळवू लागता, तेव्हा तुमच्या आयुष्यात तुम्ही वरच्या दिशेने प्रवास सुरु करता मात्र  जास्त उंचीवर ऑक्सिजनची पातळी कमी असते. तुम्ही उच्च पदांवर पोचू शकत मात्र तिथे किती दिवस राहू शकता हे महत्वाचे असत. 

“लोक दोन्ही कारणांसाठी राजकारणात जातात. एक पैसा कमवायचा आणि दुसरा सत्ता मिळवायचा. मला दोन्ही गोष्टींमध्ये रस नाही. लोकांना मदत करण्याचा प्रश्न माझ्यासमोर आला तर ते मी आज देखील करत आहे. मला कोणाची मदत करायची असेल, तर मला त्याची जात, धर्म, भाषा असं काही पाहण्याची गरज नसते.  मी जर राजकरणात गेलो तर मला माझे हे स्वातंत्र्य गमावण्याची भीती वाटते”, असं सोनू सूद म्हणला. 

Sonu Sood
Santosh Deshmukh Murder: वाल्मीक कराडच्या `त्या` बॅनरने नाशिकमध्ये कार्यकर्ते झाले आक्रमक!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com