

औरंगाबाद : ऐकावे ते नवलच.. असं नेहमी म्हटलं जातं. नगरच्या बाबतीत हे शब्द खरे ठरले आहे. (Aurangabad) परिसरातील भटक्या कुत्र्यांमुळे झोपमोड होते, शांत झोप मिळणे हा आमचा अधिकार आहे, (Ahmadnagar) असे म्हणत नगर शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात (High Court)दाखल करण्यात आली आहे.
नगर महापालिका हद्दीतील हेरीटेज काॅलनी व आसपासच्या भागात गेल्या कित्येक दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. रात्रभर भुंकणे, घरासमोरील गाड्यांचे सीट फाडणे, घुशी, उंदीर मारून ते आसपासच्या भागात आणून टाकणे, दुचाकी, चारचाकी गाड्यांवर चढून नासधूस करणे यामुळे या भागातील नागरीक अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत.
महापालिकेकडे वारंवार तक्रार करून देखील भटक्या कुत्र्यांचा काहीच बंदोबस्त होत नसल्याने अखेर या भागातील नागरिकांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. या संदर्भात याचिकाकर्त्यांचे वकील सत्यजीत कराळे पाटील यांनी माहिती देतांना सांगितले की, नगर शहरातील स्टेशनजवळ असलेल्या हेरीटेज काॅलनीतील रहिवासी गेल्या अनेक महिन्यांपासून पुरेशी झोप होत नाही म्हणून त्रस्त आहेत.
त्यांच्या या झोप न होण्यामागे कारण म्हणजे या भागात फिरणारी मोकाट कुत्री. शेकडोच्या संख्येनी ही मोकाट कुत्री रात्रभर रस्त्यावर मुक्तसंचार करत असतात. त्यांच्या भुंकण्याने रात्रभर डोळा लागत नाही. वृद्ध, आजारी, कामगार आणि सर्वसमान्यांना या मोकाट कुत्र्यांचा प्रचंड त्रास होत आहे.
महापालिकेकडे तक्रार केली तर कुत्र्यांची नसबंदी यापलीकडे दुसरा उपया नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या भागातील नागरिकांनी मदतीसाठी न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. बाहेरच्या देशात भटक्या कुत्र्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था केलेली असते, पण आपल्याकडे अद्याप तशी कुठलीच यंत्रणा नाही. नागरिकांना रात्री शांत झोपता यावे, यासाठी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त होणे गरजेचे आहे. न्यायालयाने याचिका दाखल करून घेतली असून लवकरच सुनावणी होणार असल्याचेही कराळे पाटील म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.