Delhi SFI Protest JNU: 20 वर्षांनंतर महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण,पण कार्यक्रमाला गालबोट; फडणवीसांविरोधात 'जेएनयू'मध्ये घोषणाबाजी

SFI Protest JNU : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र आणि कुसुमाग्रज मराठी अध्यासन केंद्राचे उद्घाटन करण्यात आलं.
JNU Devendra Fadnavis.jpg
JNU Devendra Fadnavis.jpgSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये (जेएनयू) महाराष्ट्र सरकारच्या वतीने उभारण्यात आलेल्या कुसुमाग्रज मराठी अध्यासन केंद्राचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या यांच्याविरोधात स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) च्या संघटनेच्या विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र आणि कुसुमाग्रज मराठी अध्यासन केंद्राचे उद्घाटन गुरुवारी(ता.24) करण्यात आलं. याच कार्यक्रमात स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) च्या संघटनेच्या विद्यार्थ्यांनी ज्या महाराष्ट्रात परप्रांतियांना मारहाण करण्यात येते आहे, त्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन नको अशी भूमिका या संघटनेच्या विद्यार्थ्यांनी घेतली.

या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली होती. पण अखेर या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उद्योगमंत्री आणि मराठी भाषा खात्याचे मंत्री उदय सामंत उपस्थित होते. तसेच संभाजीराजे छत्रपतीही हजर होते.

तब्बल 20 वर्षांनंतर गुरुवारी दिल्लीतील जेएनयूमध्ये (JNU) छत्रपती शिवाजी महाराजांच्या अध्यासन केंद्र आणि कुसुमाग्रज मराठी अध्यासन केंद्राचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. महायुतीच्या सरकारच्या गेल्या टर्ममध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी ‘जेएनयू’मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अध्यासन केंद्रासाठी 10 कोटी रुपयांचा निधी दिला होता.

JNU Devendra Fadnavis.jpg
Maharashtra Election: मोठी बातमी: निवडणूक आयोगाचा शरद पवारांच्या नेत्याला झटका; 'त्या' निर्णयाला 4 दिवसांतच स्थगिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठी अध्यायन केंद्राच्या उद्घाटनासाठी जेएनयू विद्यापीठामध्ये दाखल झाले होते. यावेळी ज्या ठिकाणी कार्यक्रम होणार होता, तिथेच विद्यार्थ्यांनी एकत्र येत आंदोलन सुरू केलं. महाराष्ट्रात मराठी भाषा विरूद्ध हिंदी भाषा जो वाद सुरू आहे, त्यात हिंदी भाषिकांवर अन्याय होत आहे. महाराष्ट्रात द्वेषाचं राजकारण सुरू असून त्याचमुळे फडणवीसांचा जेएनयूमध्ये सत्कार नको, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी आंदोलनामागे मांडली.

मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिल्लीच्या तख्तावर मराठी भाषेचे अध्यासन केंद्र सुरू करणे हे मराठी माणसासाठी अभिमानाचे आहे आणि ते पाऊल महायुती सरकारने टाकल्याची भावना बोलून दाखवली होती. तसेच मराठी भाषेला सातासमुद्रापार घेऊन जाता येत असेल, देशाच्या कानाकोपर्‍यात मराठी पोहोचवायची असेल तर दिल्लीतील जेएनयू सारख्या विद्यापीठात अध्यासन केंद्र होणे गरजेचे होते, असेही सामंत म्हणाले होते.

JNU Devendra Fadnavis.jpg
Narendra Jadhav: महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र रद्द होणार? नरेंद्र जाधवांनी दिले संकेत; नेमका घोळ काय झाला? हे ही सांगितलं

दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला दोन महिन्यांपूर्वी भेट दिली असता कुलगुरूंशी झालेल्या चर्चेत सोळा वर्षांपूर्वी महाराष्ट्र सरकारने मराठी भाषा अध्यासन केंद्रासाठी दिलेल्या 2 कोटी रुपयांची माहिती मिळाली. कुलगुरूंनी आणखी 3 कोटींची मागणी केली असता मराठी भाषा विभागाचा मंत्री म्हणून हा निधी देण्याचा निर्णय त्याच क्षणी घेतला. या मराठी अध्यासन केंद्राला कुसुमाग्रज मराठी अध्यासन केंद्र असे नाव देण्याची सूचनाही विद्यापीठाने मान्य केल्याचेही सामंत यांनी सांगितलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com